आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढणार?; शाहरुख खानच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी आर्यन खानच्या जामीनाला विरोध करण्याच्या भूमिकेत आहे. शाहरुख खानच्या ड्रायव्हरची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने महत्त्वाची माहिती दिल्याचं एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलं.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स बजावलं होतं. शाहरुखच्या ड्रायव्हरची शनिवारी जवळपास 12 तास चौकशी करण्यात आली. आर्यन खान आणि त्याच्या मित्रांबद्दल एनसीबीकडून चौकशी करण्यात आली.

या चौकशीवेळी शाहरुख खानच्या ड्रायव्हरने सांगितलं की, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना क्रूझ टर्मिनलवर सोडलं होतं. एनसीबीने ड्रायव्हरचा जबाब नोंदवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शाहरुख खानच्या ड्रायव्हरने दिलेला जबाब एनसीबी न्यायालयात सादर करणार आहे. ड्रायव्हरने दिलेल्या जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारावर एनसीबी आर्यन खानच्या जामीनाला विरोध करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Exclusive : आर्यन खानला आता तुरुंगातलंच जेवण; सहा वाजताच उठावं लागणार… अशी असेल दिनचर्या

ADVERTISEMENT

एनसीबीने आतापर्यंत केलेल्या चौकशीतून काही महत्त्वाची माहितीही समोर आली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि प्रतीक गाबा यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती आर्यनचं घर असलेल्या मन्नत बंगल्यावरून मर्सिडीज गाडीतून निघाला होता.

ADVERTISEMENT

एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे हे सर्वजण क्रूझवरील पार्टीसाठी हे सर्वजण निघाले होते. क्रूझवरील पार्टीआधी यांच्यात ड्रग्ज संदर्भात चर्चाही झाली होती. त्यासंदर्भातील पुरावे एनसीबीला मिळाले असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात अधिक माहिती काढण्यासाठी एनसीबीकडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळे आर्यन खान पार्टीमधे गेला होता’

शनिवारीही धाडसत्र

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीने शनिवारीही धाडी टाकल्या. एनबीसीच्या पथकाने मुंबईतील गोरेगाव परिसरात छापेमारी केली. ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती मुंबईच्या एनसीबी कार्यालयाने दिली आहे.

आर्यन खान 8 ऑक्टोबरपासून ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानला 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने मुंबईहुन गोव्याला जात असलेल्या क्रूझवर अटक केली होती. अरबाज खानसोबत त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. अरबाज खानने बुटामध्ये ड्रग्ज लपवले होते, अशी माहिती एनसीबीकडून देण्यात आलेली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT