शरद पवारांनी विकेटच काढली! असं का म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

मुंबई तक

वानखेडे स्टेडियमवर एका स्टँडला दिलीप वेंगसरकर यांचं नाव देण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि क्रिकेटमधले अनेक दिग्गज म्हणजेच सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले आणि त्यांच्या एका वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मला स्वतःला पाणी आणणाऱ्या मुलाने बॅटिंग बॉलिंग केल्यासारखं वाटतं आहे असं तर ते म्हणालेच. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वानखेडे स्टेडियमवर एका स्टँडला दिलीप वेंगसरकर यांचं नाव देण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि क्रिकेटमधले अनेक दिग्गज म्हणजेच सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले आणि त्यांच्या एका वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मला स्वतःला पाणी आणणाऱ्या मुलाने बॅटिंग बॉलिंग केल्यासारखं वाटतं आहे असं तर ते म्हणालेच. पण शरद पवारांनी विकेटच काढली असंही वक्तव्य केलं.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

सुनीलजी तुम्ही जर टेल एंडर म्हणून बॅटिंगला आला असाल तर मला स्वतःला पाणी आणणाऱ्या मुलाने बॅटिंग बॉलिंग केल्यासारखं वाटतं आहे. इथे आल्यानंतर आठवणी सांगायच्या होत्या, मी सांगणार होतो पण शऱद पवारांनी तर विकेटच काढली. त्यांनी काय सांगितलं की इकडे बसलेत त्यांना क्रिकेट काही कळत नाही. मला आता असं वाटतं की आम्हाला क्रिकेट कळू नये म्हणून इथले पास तुम्ही देत आलात. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे इथून स्विंग आणि स्पिन बरोबर कळतात. ते बघत बघत मी मोठा झाला आहे. मी आमच्या पिढीचा हिरो सचिनही आहे. त्याला मी हक्काने अरे-तुरे बोलतो आहे. त्यावेळी चॉकलेटच्या कागदात क्रिकेटरचा फोटो यायचा त्याचा संग्रह आम्ही करायचो अशीही आठवण आज उद्धव ठाकरेंनी सांगितली. माधव मंत्री यांची आठवण आज मलाही येते आहे. त्यांचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा घनिष्ठ परिचय होता. गप्पांमध्ये मी कधी त्यावेळी बसत नसे. कारण हे सगळे लोक वेगळ्याच दुनियेत जायचे.

सगळ्यांनी क्रिकेटबद्दलच्या आठवणी सांगायच्या. माझी आठवण सांगायला गेलो वानखेडे स्टेडियमच्या क्रिकेटच्या धावपट्टीबद्दलची तर ती थोडी वेगळी आहे. ती इथे सांगण्याची वेळ नाही. एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेन की इथे क्रिकेटरला ब्लेझर कमवावं लागतं तसंच मी या नावांबद्दल सांगेन की जी नावं दिली गेली आहेत त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. एका दिमाखदार सोहळ्याला मी उपस्थित राहिलो हे मी माझं भाग्य समजतो. क्रिेकेट हे आपल्या देशाच्या रक्तातच भिनलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp