स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात Pandit Nehru ना का डावललं? खासदार प्रियंका चतुर्वेदींचा ICHR ला सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ICHR अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्ट्ररॉकिल रिसर्चने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. मात्र या फोटोंमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंडित नेहरूंना डावलून कसा होऊ शकतो? असा प्रश्न शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी विचारला आहे.

काय आहे प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट?

ICHR ने आझादी का अमृत महोत्सव म्हणून फोटो पोस्ट केला आहे. याबाबत प्रियंका चतुर्वेदी म्हणतात, ‘तुम्ही स्वतंत्र भारताच्या निर्मितीत इतरांची भूमिका कमी केली तर तुम्ही मोठे दिसू शकाल असं नाही. आझादीचा अमृत महोत्सव तेव्हाच साजरा होऊ सकतो जेव्हा तो सगळ्यांची भूमिका मान्य करेल.भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना वगळून ICHR ने स्वतःची क्षुद्रता आणि असुरक्षितता यांचं दर्शन घडवलं आहे. या आशयाचं ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ICHR चे चेअरमन म्हणून अरविंद जामखेडकर यांचं नाव दाखवलं जातं आहे. मात्र त्यांच्याशी आम्ही या सगळ्याबाबत संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसंच मी आता चेअरमन नाही असंही मुंबई तकला सांगितलं.

ADVERTISEMENT

ICHR च्या वेबसाईटवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या शीर्षकाखाली कुणाचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत?

ADVERTISEMENT

महात्मा गांधी

सुभाषचंद्र बोस

डॉ. राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सरदार वल्लभभाई पटेल

पंडित मदनमोहन मालवीय

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

भगतसिंग

या सगळ्यांचे फोटो आहेत त्याबाबत प्रियंका चतुर्वेदी यांनी काहीही भाष्य केलेलं नाही. मात्र या सगळ्यांमध्ये पंडित नेहरूंना का वगळण्यात आलं आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे ICHR

इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे. ही संस्था फेलोशिप, अनुदान देमं इतिहासकार घडवणं यासाठी सहाय्य करते. या संस्थेला केंद्रीय शिक्षण विभागाकडून अनुदान मिळते. विविध भारतीय राज्यांकडून मदत, खासगी देणग्या आणि ICHR तर्फे प्रकाशनं यातूनही उत्पन्न मिळतं. ICHR चं मुख्य कार्यालय दिल्लीत आहे. त्याशिवाय पुणे, बंगळुरू, गुवाहाटी या ठिकाणीही प्रादेशिक केंद्रं आहेत.इतिहासकार रामशरण शर्मा हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. 1972 मध्ये ही संस्था स्थापित करण्यात आली.

इतिहासकारांना एकत्र आणणे, त्यांच्या विचारांचं आदानप्रदान घडवणं. इतिहासाच्या वस्तुनिष्ठ लिखाणाला राष्ट्रीय दिशा देणं. इतिहास संशोधनाला प्रोत्साहन देणं, गतिमान करणं ही या संस्था स्थापन करण्यामागची मुख्य उद्दीष्टं आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT