दगड आमच्याही हातात असू शकतात हे कुणी विसरू नये, संजय राऊत यांचा सूचक इशारा
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही आरोप केले आहेत. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. ‘हमाममे सब नंगे है. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. दगड आमच्याही हातात असू शकतात’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी […]
ADVERTISEMENT

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही आरोप केले आहेत. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. ‘हमाममे सब नंगे है. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. दगड आमच्याही हातात असू शकतात’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. जर तुम्ही आमच्यावर दगडफेक कराल तर दगड आमच्याही हातात असू शकतो. महाराष्ट्रात अफू सांगाजा यांची शेती आहे का असा प्रश्न पडू लागला आहे इतके आरोप झाले आहेत. मात्र राजकारणात एक कायम म्हटलं जातं की हमाममें सब नंगे. ही गोष्ट भाजपने विसरू नये असंही संजय राऊत यांनी सुनावलं आहे.
नवाब मलिक यांच्या जावयावर खोटा खटला दाखल केला होता. त्यांची वेदना आम्ही समजू शकतो. आम्ही सगळे नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीचे राजकीय नेते, त्यांची मुलं यांना त्रास दिला जातो आहे. राजकीय विरोधकांना अशा प्रकारे संपवण्याचं काम कधी झालं नव्हतं आता ते होतं आहे. शरद पवारांवरही चिखलफेक कऱण्यात आली. भाजपने त्यावर सविस्तर भूमिका मांडली पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांनी राजकारणात 50 वर्षांपेक्षा जास्त काळ काढला आहे. अशावेळी त्यांच्यावर जर घाणेरडे आरोप झाले तर महाराष्ट्र सहन करणार नाही. आमच्याही हातात उद्या दगड असू शकतात आणि तुमच्याही काचेवर दगड पडू शकतात. आम्ही अजून संयम बाळगला आहे. आम्हाला संयम सोडायला लावून नका नाही तर अत्यंत वाईट पातळीवर ही सगळी लढाई जाईल असाही इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.