ज्या शाळेत शिकली तिथल्याच मुलांना केलं ठार, कोण होती हल्लेखोर ट्रान्सजेंडर?
America school firing: ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्याच शाळेतील निरागस विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना एका 28 वर्षीय ट्रान्सजेंडरने गोळीबार करून ठार केल्याची भीषण घटना अमेरिकेत घडली आहे. जाणून घ्या हल्लेखोर नेमकी कोण होती.
ADVERTISEMENT

नॅशविले (अमेरिका) : अमेरिकेतील (America) नॅशविलेमधील एका खासगी शाळा सोमवारी बंदुकीच्या गोळ्यांनी हादरून गेली. हा हल्ला याच शाळेची माजी विद्यार्थिनी ऑड्रे हाले (वय 28 वर्ष) हिने केला. ती एक ट्रान्सजेंडर आहे. ऑड्रेकडे दोन असॉल्ट रायफल आणि एक हँडगन होती, ज्याने तिने सहा जणांना ठार केले. यामध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. (Shooting at the school where she studied Who is 28-year-old transgender audrey hale who shocked America)
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ऑड्रेला ही जागीच ठार झाली. ऑड्रेने पूर्ण नियोजन करून हा हल्ला केला होता. कारण तिच्याकडून शाळेचे नकाशेही हस्तगत झाले आहेत. 2023 मधील सामूहिक गोळीबाराची ही 129 वी घटना आहे.
हल्ला कसा केला?
पोलिसांचे म्हणणे आहे की, ऑड्रेने नॅशव्हिलेमधील ख्रिश्चन कॉव्हेंट स्कूलमध्ये बाजूच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला. गोळीबार करताना ती पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. यावेळी शाळेच्या सर्व दरवाजे बंद होते. मात्र, तिने गोळ्या झाडून हे दरवाजे तोडले आणि पुढे जात होती. त्यावेळी शाळेतील तीन मुलं आणि शाळेतील तीन कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांची तिने हत्या केली.











