सिंधुदुर्ग: पोलिसांची दादागिरी, काहीही करुन नितेश राणेंना अटक करायचीय; वकील मानेशिंदेंचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भरत केसरकर, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग पोलिसांनी आमदार नितेश राणे यांची गाडी अडवल्यामुळे त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी पोलिसांच्या अशा कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘सिंधुदुर्गातील पोलीस दादागिरी करत आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार नितेश राणे यांना अटक करायची आहे. मात्र, तसे कदापि घडणार नाही.’ अशी प्रतिक्रिया सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.

पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचेही नितेश राणे यांचे वकिल ज्येष्ठ विधीज्ञ सतीश मानेशिंदे यांनी म्हटले आहे. ‘पोलीस मनाला येईल तसे वागू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश त्यांना पाळावेच लागतील. तसे न केल्यास त्यांना सर्वोच्च न्यायालयात उत्तर द्यावे लागेल.’

सरकारी वकील काही बोलू देत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कोणी मोडू शकत नाही. असेही वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. एकूणच झाल्याप्रकाराबाबत सिंधुदुर्ग पोलिसांच्या भूमिकेविषयी वकील मानेशिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा निकाल आम्हाला अनपेक्षित होता. आम्हाला खात्री होती की, जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणे यांना जामीन देईल. मात्र हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आम्ही उद्या किंवा परवा मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागणार आहोत. पोलीस नितेश राणेंना अटक करू शकत नाहीत. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा दिवसाचा अटक न करण्याचा संरक्षण दिले आहे. अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांचे वकील अॅडवोकेट सतीश मानशिंदे यांनी दिली आहे.

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम

ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे यांचा जामीन आधीही फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

ADVERTISEMENT

सुप्रीम कोर्टाने त्यांना सिंधुदुर्ग न्यायालयात हजर होऊन जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे नितेश राणे कोर्टात हजर झाले होते. त्यांनी जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र तो आता फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला, अटकेची टांगती तलवार कायम

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते.

या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे.

सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT