Sneha Dubey: पुण्यातील फर्ग्युसनच्या विद्यार्थिनीने पाकिस्तानला सुनावलं; कोण आहे स्नेहा दुबे?

मुंबई तक

न्यू यॉर्क: पाकिस्तान (Pakistan) काश्मीरबाबत आपला घृणास्पद विचार कधीही सोडत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA)पुन्हा एकदा काश्मीरबाबत (Kashmir) सूर आळवला आहे. पण नेहमीप्रमाणे या वेळीही त्याला भारताकडून (India) चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे (Sneha Dubey) यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

न्यू यॉर्क: पाकिस्तान (Pakistan) काश्मीरबाबत आपला घृणास्पद विचार कधीही सोडत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA)पुन्हा एकदा काश्मीरबाबत (Kashmir) सूर आळवला आहे. पण नेहमीप्रमाणे या वेळीही त्याला भारताकडून (India) चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे (Sneha Dubey) यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देणं हा आजवरचा पाकिस्तानचा इतिहास आहे.

स्नेहा दुबे यांनी उत्तर देण्याचा अधिकार (Right to Reply) वापरून उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘पाकिस्तानच्या नेत्याने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर करून माझ्या देशाविरुद्ध खोटा आणि द्वेष भावनेने प्रचार करण्याची ही काही पहिली वेळ नाही.

आपल्या देशातील वाईट परिस्थिती जगाला दिसू नये यासाठी पाकिस्तानी नेते संपूर्ण जगाचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे दहशतवादी मुक्तपणे फिरतात. तर सामान्य नागरिक, विशेषत: अल्पसंख्यांक समाजातील लोकांवर अत्याचार केले जातात.’ असं चोख उत्तर स्नेहा दुबे यांनी दिलं आहे.

कोण आहे स्नेहा दुबे?

हे वाचलं का?

    follow whatsapp