सामाजिक कार्यकर्त्या आणि बिगबॉस फेम 'ताई' तृप्ती देसाई कोरोना पॉझिटिव्ह, काळजी घेण्याचं केलं आवाहन

सामाजिक कार्यकर्त्या आणि बिगबॉस फेम 'ताई' तृप्ती देसाई कोरोना पॉझिटिव्ह, काळजी घेण्याचं केलं आवाहन

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रातले सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईत आहेत. एवढंच नाही तर सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनाही कोरोनाची बाधा होते आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉस मराठी फेम तृप्ती देसाई यांना कोरोना झाला आहे. फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्या विविध पोस्ट करून त्यांच्याबाबतची माहिती देत असतात. आज त्यांनी त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाने मला गाठलंच. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे असं तृप्ती देसाई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे तृप्ती देसाई यांची फेसबुक पोस्ट?

अखेर "कोरोनाने" मला गाठलचं- #माझी_टेस्ट #पॉझिटिव्ह_आली_आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी परंतु नियमांचे पालन मी करीत होते....जेंव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा.

सामाजिक कार्यकर्त्या आणि बिगबॉस फेम 'ताई' तृप्ती देसाई कोरोना पॉझिटिव्ह, काळजी घेण्याचं केलं आवाहन
'ताईगिरी' संपली! Bigg Boss च्या घरातून तृप्ती देसाई बाहेर

तृप्ती देसाई या बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वाच्या स्पर्धक होत्या. काही आठवडे घरात राहिल्यानंतर त्या एलिमिनेट झाल्या. तृप्ती देसाई या तब्बल 50 दिवस बिग बॉसच्या घरात होत्या. यानंतर महेश मांजेरकरांनी 50 दिवसांचा प्रवास कसा वाटला? असा प्रश्न तृप्ती देसाईंना विचारला.

संतोष चौधरी उर्फ दादूस आणि तृप्ती देसाई.
संतोष चौधरी उर्फ दादूस आणि तृप्ती देसाई.Dadus Alare Official/facebook

त्यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, “50 दिवस हा फार मोठा प्रवास आहे. पण बिग बॉसच्या घराबद्दल बरेच गैरसमज आहेत. मात्र बिग बॉसचे घर हे फार छान आहे. मी सर्वांची मनं जिंकलंय हे सर्वात मोठं आहे. मी सामाजिक कार्य करते हे मी आधी लोकांना सांगत होते. पण आता लवकरच मी राजकारणात प्रवेश करणार आहे,” असे तृप्ती देसाईंनी यावेळी सांगितले. एवढंच नाही तर दादूस म्हणजेच संतोष चौधरी आणि तृप्ती देसाई यांची बहिण भावाची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलीच उतरली होती. त्यांनी रविवारीच कोरोनाचे नियम पाळण्यासंदर्भातला एक व्हीडिओ पोस्ट केला होता. कोरोना टाळण्यासाठी काय काय करता येईल? त्याचं आवाहन संतोष चौधरी आणि तृप्ती देसाई यांनी रविवारी व्हीडिओच्या माध्यमातून केलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज तृप्ती देसाई यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in