मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या…मरु द्या, माझे नेते Ajit Pawar ! सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणेंचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सार्वजनिक कार्यक्रमात बोलत असताना राजकीय नेत्यांनी भान बाळगून बोलणं अपेक्षित असतं. अनेकदा नेत्यांची जीभ भाषणात घसरलेली महाराष्ट्राने पाहिली आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे आज स्वातंत्र्यदिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नकळत आक्षेपार्ह गोष्ट बोलून गेले. सर्व अधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीमेचा कार्यक्रम पार पडला. प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव रोड येथे ४३ एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांचा भांडवली निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलत असताना दत्ता भरणेंनी चंदनशिवे यांचे आभार मानले आणि मला खूप काही मिळालं आहे. तुम्हाला जो काही आशिर्वाद द्यायचा आहे तो दादांना द्या. अजित पवार माझे नेते आहेत असं म्हटलं. यावेळी सोलापूरच्या महापौर प्रस्तावाविषयी बोलत असताना पालकमंत्री दत्ता भरणेंनी…”मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरु द्या हे काम आपलं आपण करु. त्यांच्याकडून आपण मोठा निधी घेऊ”, असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

माझी वसुंधरा अभियान हा कार्यक्रम पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राबवलेला उपक्रम आहे. याच कार्यक्रमात बोलत असताना दत्ता भरणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल असे उद्गार काढल्यामुळे उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकारही चांगलेच अवाक झालेले पहायला मिळाले. दिवसभर सोलापूरात दत्ता भरणेंच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

Independence Day History : जेव्हा सोलापूरकरांनी पारतंत्र्यातही ३ दिवस उपभोगलं स्वातंत्र्य

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT