सोलापूर : जनावरांच्या हाडांपासून भुकटी आणि डाळडा बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर-तुळजापूर रोड येथील कचरा डेपोजवळ वीज चोरी करुन जनावरांचे मांस आणि हाडापासून डाळडा तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाकडुन कारवाई करण्यात आले आहे. कचरा डेपोच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार सुरु होता.

जनावरांच्या हाडापासून या भागात डाळडा आणि भुकटी बनवणं सुरु असल्यामुळे आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती. याविरोधात स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस पथकाने छापेमारी केली असता त्यांना, मोकळ्या जागेत ७ लोखंडी कढईमध्ये जनावराचं मांस, हाडं वितळवण्याचं काम सुरु असल्याचं लक्षात आलं.

सोलापूर : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, माजी आमदार रविकांत पाटील यांना जुगार खेळताना अटक

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा कारखाना चालवण्यासाठी वीजही चोरुन वापरण्यात आल्याचं पोलीस पथकाला लक्षात आलं. यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून ही बाब नक्की करुन घेतल्यानंतर पोलिसांनी हा कारखाना चालवणारे मालक अब्दुल कुरेशी आणि अलिम कुरेशी यांच्याविरुद्ध जोडभावीपेठ पोलिसांत तक्रार दाखल केली असून हा कारखानाही सिल केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT