Ladakh : मोदीजी, जिवंत राहिलो, तर… सोनम वांगचुक यांनी मांडली व्यथा

मुंबई तक

लडाख : रँचो म्हणून भारतभरात ओळखले जाणारे लडाखचे सोनम वांगचूक (sonam wangchuk) यांनी केंद्र सरकारला (Central Govt) इशारा दिलाय. वांगचूक यांनी हिमालयीन प्रदेश, विशेषत: लडाखच्या (Ladakh) हिमनद्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हिमनद्या नष्ट होण्यापासून वाचवा नाहीतर, नामशेष होतील असे आवाहन वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) केले आहे. (Sonam Wangchuk expressed his […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लडाख : रँचो म्हणून भारतभरात ओळखले जाणारे लडाखचे सोनम वांगचूक (sonam wangchuk) यांनी केंद्र सरकारला (Central Govt) इशारा दिलाय. वांगचूक यांनी हिमालयीन प्रदेश, विशेषत: लडाखच्या (Ladakh) हिमनद्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हिमनद्या नष्ट होण्यापासून वाचवा नाहीतर, नामशेष होतील असे आवाहन वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) केले आहे. (Sonam Wangchuk expressed his grief about safety and protection-of-ladakh glacier to PM Modi)

लडाखच्या या परिस्थितीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोनम वांगचूक 26 जानेवारीपासून 5 दिवस तब्बल उणे 40 अंश तापमानात उपोषण करणार आहेत. लडाखकडे असेच दुर्लक्ष होत राहिले, तर येथील हिमनद्या नामशेष होतील, यावर त्यांनी भर दिला आहे. यामुळे भारत आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान मोदींना म्हणाले…’जीवंत राहिलो तर, पुन्हा भेटेन’

सोनम वांगचूक यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे लडाखमधील परिस्थितीबद्दल उच्च स्तरीय कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. सोनम वांगचूक म्हणाले, “माझे पंतप्रधान मोदींना आवाहन आहे की, लडाख आणि इतर हिमालयीन प्रदेशांना औद्योगिक शोषणापासून वाचवा, कारण त्याचा परिणाम लडाखमधील लोकांच्या जीवनावर होईल. याकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी मी प्रजासत्ताक दिनापासून ५ दिवस उपोषणाला बसणार आहे. खारडुंगला येथे उणे 40 अंश तापमानात उपोषण केल्यानंतर मी जिवंत राहिलो, तर तुम्हाला पुन्हा भेटेन.”

Jayant Patil: ‘वंचित’बद्दल NCP सकारात्मक! मातोश्रीवर काय झाली चर्चा?

लडाखचे उद्योगांपासून संरक्षण केले नाही, तर…- सोमन वांगचूक

सोमन वांगचूक पुढे म्हणतात, ‘लडाखचे उद्योगांपासून संरक्षण केले नाही, तर हिमनद्या-हिमपर्वत नामशेष होतील. कारण, उद्योगांमुळे पाण्याची टंचाई भासेल. येथे शेकडो उद्योग उभारले. खाणकाम झाले, तर धूळ आणि धुरामुळे हिमनद्या नष्ट होतील.’

Pune Crime : एकाच कुटुंबातील त्या 7 जणांची आत्महत्या नाही, तर हत्या!

सोनम वांगचूक कोण आहेत?

सोनम वांगचूक यांचा जन्म 1966 मध्ये झाला. ते मेकॅनिकल इंजिनिअर आणि हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज, लडाखचे (HIAL) संचालक आहेत. त्यांना 2018 मध्ये मॅगसेसे पुरस्कार मिळाला. 2009 मधील 3 इडियट्स चित्रपटात आमिर खानने पुंसुख वांगडूची भूमिका ही सोनम वांगचूक यांच्यावर आधारित आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp