ST Strike: निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

ST Strike: निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
st employee who was poisoned for fear of suspension died during treatment buldhana st strike(प्रातिनिधिक फोटो)

जका खान, बुलडाणा

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सतत चिघळत असताना आता बुलडाण्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील एका कर्मचाऱ्याने निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपूर्वी विष प्राशन केलं होतं. याच कर्मचाऱ्याचा आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव विशाल अंबळकार असं असून त्याच्यावर अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते.

एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारल्यानंतर हा संप मिटविण्यासाठी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाच्या कारवाई केली जात आहे. दरम्यान, निलंबनाच्या याच भीतीतून बुलढाणा जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या विशाल अंबळकार या एसटी कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या घटनेनंतर त्याला उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आलं आहे. मात्र, आज (18 नोव्हेंबर) त्याचा मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव डेपोमध्ये कार्यरत असलेल्या विशाल प्रकाश अंबळकार यांनी निलंबनच्या चिंतेतून विष प्राशन केल्याचं माहिती त्याच्या वडिलांनी दिली होती. विशाल अंबळकार गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाला होता.

संपात सहभागी झालेल्या आणि कामावर परतण्यास इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. निलंबनाच्या याच चिंतेतून 29 वर्षीय विशाल अंबळकार याने विष प्राशन केलं होतं.

मृत एसटी कर्मचारी विशाल अंबळकार
मृत एसटी कर्मचारी विशाल अंबळकार

माटरगावमधील राहत्या घरात त्याने विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्याला तातडीने खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. पण, प्रकृती ढासळल्याने त्याला अकोला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

निलंबनाच्या भीतीमुळे तो मागच्या 4 दिवसांपासून चिंतेत असल्याचं त्याच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 'माझी सरकारला विनंती आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची पावलं उचलू नयेत म्हणून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.' अशी मागणीही विशालच्या वडिलांनी सरकारकडे केली होती.

st employee who was poisoned for fear of suspension died during treatment buldhana st strike
ST Strike : निलंबनाच्या धास्तीने एसटी कर्मचाऱ्याने घेतलं विष; मृत्यूशी झुंज सुरू

आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका

जो पर्यंत महामंडळाचे विलगीकरण राज्य शासनामध्ये होणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही केलेला संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. 'करो या मरो; या भूमिकेमध्ये सध्या तरी आंदोलनकर्ते पाहायला मिळतात. दुसरीकडे या परिस्थितीमुळे काही एसटी कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत. ज्यामुळे सध्या परिस्थिती ही अत्यंत बिकट बनली असून याबाबत सरकारने लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी आता केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in