ST Strike : एसटीच्या खासगीकरणाबद्दल गुलाबराव पाटलांचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांना केलं आवाहन
–मनीष जोग, जळगाव एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर सुरू केलेला संप अजूनही सुरूच आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली लालपरी ठप्प झाली आहे. सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यातील कोंडी कायम असल्याचं चित्र असून, आता सरकार एसटी महामंडळाचं खासगीकरण करणार असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. यातच […]
ADVERTISEMENT

–मनीष जोग, जळगाव
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर सुरू केलेला संप अजूनही सुरूच आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली लालपरी ठप्प झाली आहे. सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यातील कोंडी कायम असल्याचं चित्र असून, आता सरकार एसटी महामंडळाचं खासगीकरण करणार असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. यातच राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एसटी महामंडळाच्या खासगीकरणाबद्दल मोठं विधान केलं आहे.
गुलाबराव पाटील यांनी ‘मुंबई Tak’च्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर कोंडी कायम राहिली, तर एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्यापासून सरकारला कुणीही रोखू शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
Explainer: एसटी महामंडळाचे विलीनीकरण म्हणजे काय? काय आहेत मागण्या?