ST Strike : एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू; आठ दिवसांपासून होते तणावाखाली

मध्यरात्री त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र मृत्यूसोबतची झुंज ठरली अपयशी
मयत एसटी कर्मचारी संतोष वसंत शिंदे.
मयत एसटी कर्मचारी संतोष वसंत शिंदे.

गेल्या ११ दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. मेढा आगारातील एका कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला आहे. मागील आठ दिवसांपासून ते तणावाखाली होते, असं कुटुंबियांनी सांगितलं.

राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असतानाच साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. संतोष वसंत शिंदे (वय ३४, रा. आसगाव ता. सातारा) असं कर्मचाऱ्याचं नावं असून, त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ते मेढा एसटी डेपोचे कर्मचारी असून तटपुंजा पगार व संपामुळे ते तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मयत एसटी कर्मचारी संतोष वसंत शिंदे.
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यातच घातला दगड

संतोष शिंदे यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. तीन वर्षांपूर्वी ते मेढा एसटी डेपोमध्ये रुजू झाले होते. अशातच लॉकडाऊन लागला व आता संप सुरू झाला. यामुळे तटपुंज्या पगारात जगायचे कसे या विचाराने ते हताश झाले होते. अशातच गेल्या आठ दिवसांपासून ते तणावाखाली होते. काल मध्यरात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दुर्दैवाने मात्र त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मयत एसटी कर्मचारी संतोष वसंत शिंदे.
ST Strike : निलंबनाच्या धास्तीने एसटी कर्मचाऱ्याने घेतलं विष; मृत्यूशी झुंज सुरू

संतोष शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, आई, वडील, दोन लहान भाऊ असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in