सांगली : मिरज-पंढरपूर रस्त्यावर गोवा बनावटीची ६० लाखांची दारु जप्त
मिरज-पंढरपूर मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ६० लाखाची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज येथील भरारी पथकाने केलेल्या कारवाईत कंटेनरसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान दारुचे हे बॉक्स सिमेंटच्या पोत्याच्या आड लपवून आणले जात होते. गोव्यातून गोवा बनावटीच्या दारुचा मोठा साठा बेळगावमार्गे महाराष्ट्रात आणला जात असल्याची […]
ADVERTISEMENT

मिरज-पंढरपूर मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ६० लाखाची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज येथील भरारी पथकाने केलेल्या कारवाईत कंटेनरसह १ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चौकशीदरम्यान दारुचे हे बॉक्स सिमेंटच्या पोत्याच्या आड लपवून आणले जात होते. गोव्यातून गोवा बनावटीच्या दारुचा मोठा साठा बेळगावमार्गे महाराष्ट्रात आणला जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार मिरज-पंढरपूर रस्त्यावर मंगळवारी रात्री सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत अधिकाऱ्यांनी एक कंटेनर भरुन देशी-विदेशी मद्य आणि बिअरच्या बाटल्यांचा मोठा स्टॉक जप्त केला आहे. बाजारात या मालाची किंमत ६० लाखांच्या घरात असल्याचं बोललं जातंय.
सांगली : मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय ठरलं कोरोना हॉटस्पॉट; 47 विद्यार्थीनी ‘पॉझिटिव्ह’