झेंडा लावण्यावरून उस्मानाबादमध्ये तुफान दगडफेक; सहा पोलीस जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गणेश जाधव, उस्मानाबाद

उस्मानाबाद शहरात झेंडा लावण्याच्या किरकोळ कारणावरून काल (19 ऑक्टोबर) रात्री उशिरा दोन गटात तुफान दगडफेक झाली. दरम्यान या दगडफेकीत असून सहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे समजते आहे.

दोन गटात अचानक झालेल्या तुफान दगडफेकीच्या घटनेने संपूर्ण उस्मानाबाद शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दोन समाजाचे काही लोकं हे झेंडे लावण्यासाठी उस्मानाबादमधील विजय चौक येथे आमनेसामने आले होते. यावेळी दोन्ही गटाची बाचाबाची झाली होती. दरम्यान, दोन्ही गटाकडून काही पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आल्या. ज्यानंतर अचानक रात्रीच्या सुमारास एकमेकांवर दगडफेक सुरु करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने वेळीच स्थिती नियंत्रणात आली. मात्र, या संपूर्ण घटनेने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना असं म्हटलं आहे की, ‘नागरिकांना नम्र आवाहन आहे की, कृपा करुन दगडफेक करु नका. पोलिसांना सहकार्य करा. फेसबुकवर जी काही कमेंट आली आहे त्यावर रितसर कारवाई करण्यात येत आहे.’

ADVERTISEMENT

‘तसेच ज्यांनी कायदा हातात घेऊन ज्या कोणी दगडफेक केली आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.’

ADVERTISEMENT

‘दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरुन जाऊ नका.. आपल्या सुरक्षेसाठी पोलीस आहेत. सर्वांनी आपआपल्या घरातच थांबा.. कुणीही बाहेर पडू नये. किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. जो आता अटोक्यात आला आहे.’ असं आवाहन पोलिसांकडून आलं आहे.

आरोपीला पळवून नेण्यासाठी पोलीस ठाण्यावर दगडफेक, धुळ्यातील दोंडाईचा येथील घटना

दुसरीकडे आता पोलिसांनी याप्रकरणी चिथावणीखोर भाष्य करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली असून काही जणांची धरपकड देखील केली असल्याचं समजतं आहे. तसेच या संपूर्ण घटनेचे पडसाद शहरात इतरत्र कुठेही उमटू नयेत यासाठी देखील पोलिसांनी अनेक संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला आहे.

दरम्यान, दिवसभर ज्या अफवा पसरवल्या जात होत्या त्यातूनच ही दगडफेक झाली असल्याचं यावेळी सांगण्यात येत आहे. त्यामुळे अफवा पसरवणऱ्यांना अटक करण्याचं मोठं आव्हानं सध्या पोलिसांसमोर आहे. अशावेळी पोलिसांकडून कशी कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उस्मानाबाद शहरातील विजय चौक भागात झालेल्या दगडफेक व पोलिसांवरील प्राणघातक हल्ला प्रकरणी 43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दगडफेकीत 6 पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम 307 सह अन्य 10 वेगवेगळ्या कलमांने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडुन आरोपींचा शोध सुरू आहे. अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी दिली.

आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यासाठी पोलीस दलाचे काही कर्मचारी गेल्यानंतर त्यांच्यावर 25 ते 30 जणांच्या जमावाने विटा, दगड, फरशी फेकून हल्ला केला. त्यानंतर पोलिसांची इतर टीम आल्यावरही 150 ते 200 जणांनी पुन्हा हल्ला केला. यात सहायक पोलिस निरीक्षक सुर्वे यांच्यासह सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले.

पोलीस कर्मचारी सायलू बिरमवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 307, 333, 332, 353, 143, 147, 148, 149, 294 सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT