गुजरातहून पुण्यात येणारा तब्बल 11 लाखांचा गुटखा जप्त, आळेफाटा पोलिसांची धाडसी कारवाई
स्मिता शिंदे,जुन्नर: महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या गुजरातमधून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावर सापळा रचून गुटख्याने भरलेली कार पकडण्यात आली आहे. आळेफाटा पोलिसांनी मोठी जोखीम पत्करुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला पकडलं आहे. या कारवाईत तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (23 जानेवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलिसांनी केली आहे. […]
ADVERTISEMENT

स्मिता शिंदे,जुन्नर: महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या गुजरातमधून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावर सापळा रचून गुटख्याने भरलेली कार पकडण्यात आली आहे. आळेफाटा पोलिसांनी मोठी जोखीम पत्करुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला पकडलं आहे. या कारवाईत तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (23 जानेवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलिसांनी केली आहे.
आळेफाटा पोलिसांनी या कारवाईत एक रेनॉल्ड कारसह शैलेश शशिकांत बनकर (वय 36 रा. रानमळा, कडूस ता. खेड) आणि सचिन सखाराम सांडभोर (वय 30, रा. दोंदे ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस कर्मचारी पद्मसिंह अप्पाराव शिंदे पोलीस वाहनातून रविवारी पहाटे पुणे-नाशिक महामार्गावर गस्त घालत होते. आळेखिंड येथून आळेफाट्याच्या दिशेने येत असताना पोलीस गाडी पाहून रेनॉल्ड कार नंबर MH 12 TS 1943 चालकाने सुसाट पुढे पळविली. या कारचा जेव्हा पाठलाग करण्यात आला तेव्हा कार चालकाने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर अत्यंत धाडसाने कारला अडविण्यात आलं.
याबाबत जेव्हा चौकशी केली असता गाडीमधील चालकाने आम्ही घाईत असून आम्हाला जाऊद्या अशी विनंती केली. मात्र, पोलिसांनी काहीही ऐकून न घेता कारची तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये खोके आणि काही मोठे पोते आढळून आले. त्यानंतर कार आळेफाटा पोलीस ठाण्यात आणून अधिकची चौकशी करण्यात. तेव्हा या कारमध्ये विमल गुटखा सापडला.