निवडणूक आयोगामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या 12 निलंबित आमदारांना मोठा दिलासा !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पावसाळी अधिवेशन तीन दिवस झालं पण ते पहिल्याच दिवशी वादळी ठरलं ते भाजपच्या 12 आमदरांच्या निलंबनामुळे. अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांचे नेते भिडले होते. पीठासीन अध्यक्ष असलेले भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झाली होती. तसंच शिवीगाळ झाली असाही आरोप त्यांनी केला होता. यानंतर भास्कर जाधव यांनी त्यांच्यासोबत काय घडलं ते सांगत भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं. या 12 आमदरांना निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे.

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्यात पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. 4 ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, या पोटनिवडणूकीत भाजपाचे निलंबित बारा आमदार देखील मतदान करु शकणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळ प्रशासनाला भाजपाच्या निलंबित बारा सदस्यांसाठी मुंबईतील विधान भवनाच्या परिसराबाहेर मतदानासाठी स्वतंत्र बूथ स्टेशनची तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत.

निलंबित असल्यामुळे 12 आमदार विधान भवनाच्या परिसरात येऊ शकत नाही. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूकीत मतदान करण्यासाठी त्यांची वेगळी व्यवस्था सरकारला करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार 22 सप्टेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. हा अर्ज महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावा लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे

काय घडलं होतं 5 जुलैला?

ADVERTISEMENT

५ जुलैला विधानसभेचं कामकाज सुरू असताना डॉ. संजय कुटे, अॅड. आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अॅड. पराग अळवणी, हरिश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार उर्फ बंटी बागडिया यांनी सभागृहात गैरवर्तन केलं. सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्च भाषण केलं. माईक आणि राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. वारंवार सूचना देऊनही सभागृह तहकूब झाल्यानंतरही माननीय अध्यक्षांच्या दालनात पुन्हा एकदा सगळ्या सदस्यांनी गैरवर्तन केलं होतं. ज्यानंतर या सगळ्यांचं निलंबन करण्यात आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT