Modi Cabinet: मोदींच्या मंत्रिमंडळात 15 नवे कॅबिनेट मंत्री, कोणाकोणाचं झालं प्रमोशन?
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज (7 जुलै) पार पडला. यावेळी तब्बल 43 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यापैकी 15 जणांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. ज्यामध्ये सध्या मंत्रिमंडळात असणाऱ्या काही मंत्र्यांचं प्रमोशन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारबाबत जेव्हा चर्चा सुरु झाली तेव्हा या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार यावरुन बरीच खलबतं सुरु होती. अखेर […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज (7 जुलै) पार पडला. यावेळी तब्बल 43 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यापैकी 15 जणांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. ज्यामध्ये सध्या मंत्रिमंडळात असणाऱ्या काही मंत्र्यांचं प्रमोशन करण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारबाबत जेव्हा चर्चा सुरु झाली तेव्हा या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार यावरुन बरीच खलबतं सुरु होती. अखेर 15 जणांना कॅबिनेट मंत्री म्हणून नव्याने मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
कॅबिनेट मंत्रिपदी ‘या’ 15 जणांची वर्णी
1. नारायण राणे (Shri Narayan Tatu Rane) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार नारायण राणे यांची आता कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरु केलेल्या राणेंनी आता थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे.