सत्ताधारी 164 तर विरोधी पक्षाच्या बाजूने 107 आमदारांचे मतदान; ‘हे’ आमदार राहिले तटस्थ
मुंबई: आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यामध्ये अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकरांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्याबाजून 164 जणांनी मतदान केले तर 107 जणांनी विरोधात मतदान केले आहे. काही आमदार तटस्थ राहिले तर काही आमदार अनुपस्थीत राहिले. आजचं अधिवेशन वादळी ठरणार असे वाटत होते परंतु अध्यक्षांची निवड अतिशय शांततेत पार […]
ADVERTISEMENT
मुंबई: आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यामध्ये अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकरांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्याबाजून 164 जणांनी मतदान केले तर 107 जणांनी विरोधात मतदान केले आहे. काही आमदार तटस्थ राहिले तर काही आमदार अनुपस्थीत राहिले.
ADVERTISEMENT
आजचं अधिवेशन वादळी ठरणार असे वाटत होते परंतु अध्यक्षांची निवड अतिशय शांततेत पार पडली आहे. विधिमंडळात राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विरुद्ध राजन साळवी (Rajan Salavi) असा सामना रंगला होता. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे.
Live Updates : विधानसभेत पहिली लढाई शिंदेंनी जिंकली, १६४ मतं मिळवत राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष
हे वाचलं का?
खालील आमदार तटस्थ तर काही अनुपस्थीत
1. नवाब मलिक, (राष्ट्रवादी)
ADVERTISEMENT
2. अनिल देशमुख (राष्ट्रवादी)
ADVERTISEMENT
3. निलेश लंके (राष्ट्रवादी)
4. दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
५. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी)
6. बबन शिंदे (राष्ट्रवादी)
7. अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
8. लक्ष्मण जगताप (भाजप)
९. मुक्ता टिळक (भाजप)
10. प्रणिती शिंदे (काँग्रेस)
11. मुफ्ती इस्माईल (एमआयएम)
12. रमेश लटके (शिवसेना) (आता नाही)
13. उपसभापती मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्तेतून बाहेर पडून आम्ही विरोधकांसोबत येत नवं सरकार स्थापन केलं. या राज्यात आता खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT