उत्तर प्रदेशात बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, १७ जणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बस आणि रिक्षाच्या झालेल्या अपघातात १७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या दरम्यान सचेंडी भागात हा अपघात घडला. अपघातात ४ जणं गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लाला लजपत राय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

ADVERTISEMENT

दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली, ही बस लखनऊ वरुन दिल्लीला जात होती. अशी माहिती IG मोहित अग्रवाल यांनी दिली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी अनेक जण हे बिस्कीट कंपनीत काम करणारे कामगार आहेत. सकाळी कामावर जात असताना बससोबत धडक झाल्यानंतर हा अपघात घडला आहे. अपघाताचं नेमकं कारण काय आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. यापैकी १० जणांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. उर्वरित ७ जणांनी उपचारादरम्यान आपले प्राण सोडले. या अपघातात जखमी झालेल्यांची परिस्थितीही गंभीर असल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT