माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अटकेविरोधात काटोल विधानसभा क्षेत्रात 18 आंदोलनं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

ADVERTISEMENT

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडीने केलेल्या अटके विरोधात त्यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा क्षेत्रात आज ठिकठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आलं.

एकीकडे परमबीर सिंग हे राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगासमोर म्हणतात की माझ्याकडे पत्राशिवाय कोणतेही पुरावे नाही आणि दुसरीकडे मात्र सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट मध्ये ईडी सांगते की अनिल देशमुख हे संशयित आहेत म्हणून त्यांची चौकशी करायची आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर अनिल देशमुख हे ईडी समोर चौकशीसाठी जातात. चौकशी अपूर्ण असतानाही त्यांना मध्यरात्री अटक करण्यात येते. तक्रारकर्ता म्हणतो माझ्याकडे पुरावे नाही आणि केंद्रीय तपास यंत्रणा मात्र देशमुख कुटुंबाच्या मागे लागले आहे. या संस्थांवर केंद्रातील भाजप सरकारचा दबाव आहे हे यावरून स्पष्ट होते.

हे वाचलं का?

देशमुख कुटुंबीयांची चौकशी करीत असताना त्यांच्या घरावर धाड टाकतात. तक्रार करते परमवीर सिंग यांची मात्र अजूनही चौकशी करण्यात आली नाही. केंद्रातील भाजपा सरकार हे परमवीर सिंग यांना हाताशी धरून देशमुख कुटुंबीय विरुद्ध कट कारस्थान रचत आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. केंद्रीय संस्था खोट्या आरोपात अनिल देशमुख यांना फसवत असून त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत असल्याने काटोल विधानसभा क्षेत्रात आज जवळपास 18 ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिक आपापल्या पद्धतीने आंदोलन करून अनिल देशमुख यांच्या अटकेचा निषेध करीत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अनिल देशमुख हे 1 नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर एक दिवसानेच परमबीर सिंग यांचं एक प्रतिज्ञापत्र समोर आलं आहे. या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे नाहीत असं म्हटलं आहे. त्यानंतर आता आज काटोल मतदारसंघात आम्ही साहेबांसोबत असे पोस्टर हातात घेऊन 18 ठिकाणी आंदोलन करण्यता आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT