PUBG गेमच्या नादात 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या?, राहत्या घरात घेतला गळफास
मनीष जोग, जळगाव जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने इंटरनेटवरील ‘पब्जी’ गेम (PUBG) खेळण्याच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना आज (रविवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामनेरमध्ये घडली असल्याचं समजतं आहे. अवघ्या 19 वर्षीय वयाच्या तरुणीने एका व्हीडिओ गेमच्या आहारी जाऊन […]
ADVERTISEMENT

मनीष जोग, जळगाव
जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने इंटरनेटवरील ‘पब्जी’ गेम (PUBG) खेळण्याच्या नादात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना आज (रविवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामनेरमध्ये घडली असल्याचं समजतं आहे. अवघ्या 19 वर्षीय वयाच्या तरुणीने एका व्हीडिओ गेमच्या आहारी जाऊन अशाप्रकारे विचित्र पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली सुसाईड नोट-
तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. त्यात तिने असं लिहलं आहे की, ‘मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत असून, यात माझ्या घरच्यांचा किंवा कोणाचाही दोष नाही’ असा उल्लेख केला आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी तपासकामी जप्त केली आहे.