Pune जिल्ह्यात कोरोनाच्या Dleta Plus Varinet चे आणखी दोन रूग्ण

मुंबई तक

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी दोन रूग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यातील नीरा गावातले हे रहिवासी आहे. थोपटेवाडी या ठिकाणी ते वास्तव्य करतात. पुरंदर तालुक्याच्या आरोग्य अधिकारी उज्वला जाधव यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही माहिती दिली आहे. हे दोन रूग्ण म्हणजे एक 14 वर्षांचा मुलगा आणि 48 वर्षांची एक स्त्री आहे. 15 जुलैला या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी दोन रूग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यातील नीरा गावातले हे रहिवासी आहे. थोपटेवाडी या ठिकाणी ते वास्तव्य करतात. पुरंदर तालुक्याच्या आरोग्य अधिकारी उज्वला जाधव यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही माहिती दिली आहे. हे दोन रूग्ण म्हणजे एक 14 वर्षांचा मुलगा आणि 48 वर्षांची एक स्त्री आहे. 15 जुलैला या दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यानंतर हे दोघेही कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने बाधित झाले आहेत असं समजतं आहे. या दोघांवरही उपचार करण्यात आले असून दोघांनाही उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोघांचीही प्रकृती आता व्यवस्थित आहे असंही उज्वला जाधव यांनी सांगितलं. या दोघांच्या संपर्कात आलेल्यांच्या 100 जणांची चाचणीही करण्यात आली आहे.

यााधी 28 जुलैला मुंबईतही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळले होते त्यामुळे डेल्टा व्हेरिएंट आढळलेल्या एकूण रूग्णांची संख्या 23 झाली होती. त्यापाठोपाठ आता आणखी 2 रूग्ण आढळले आहेत त्यामुळे ही संख्या 25 झाली आहे. डेल्टा व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं जाहीर करण्यात आलं आहे.

Variant Of Concern म्हणजे नेमकं काय?

हे वाचलं का?