Pune Crime : क्षुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलांनी केली हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद
पिंपरी-चिंचवडमध्ये क्षुल्लक कारणावरुन दोन अल्पवयीन मुलांनी एका इसमाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली असून दुचाकी चालवताना धक्का लागल्यामुळे समोरील व्यक्तीने कानशिलात लगावल्याचा राग मनात धरुन दोन अल्पवयीन आरोपींनी हे कृत्य केल्याचं कळतंय. पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात हा गुन्हा घडला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील सागर हे एका खासगी कंपनीत […]
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवडमध्ये क्षुल्लक कारणावरुन दोन अल्पवयीन मुलांनी एका इसमाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली असून दुचाकी चालवताना धक्का लागल्यामुळे समोरील व्यक्तीने कानशिलात लगावल्याचा राग मनात धरुन दोन अल्पवयीन आरोपींनी हे कृत्य केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात हा गुन्हा घडला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील सागर हे एका खासगी कंपनीत कामाला होते. ज्यानंतर ते एका गोठ्यात सफाईचं काम करायचे. शुक्रवारी रात्री कंपनीतून सुटल्यानंतर ते चिखली मधील एका गोठ्यामध्ये सफाईच्या कामासाठी जात होते. जाधववाडी येथून रस्त्याने पायी जात असताना एका दुचाकीचा त्यांना धक्का लागला. त्यामुळे संतापलेल्या सागर यांनी दुचाकीवरील एका मुलाला कानशिलात लगावली.
पुणे: रस्तावरुन जाणाऱ्या 12 वर्षाच्या मुलाच्या डोक्यातच घुसली सळई, Video व्हायरल
हे वाचलं का?
यानंतर दोन्ही अल्पवीयन आरोपींनी सागर यांनाच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी सुनील सागर हे तिकडून पळ काढत एका दुकानात घुसले. परंतू या अल्पवयीन मुलांनी पाठलाग करत त्यांना मारहाणीला सुरुवात केली. इतकच नव्हे तर सुनील यांना बाहेर खेचत दोन्ही आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पिंपरी-चिंचवड मधली गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरतो आहे. pic.twitter.com/uF1WCLuulR
— Prathmesh Dixit (@PrathmeshDixit2) January 3, 2022
या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही मध्ये दोन जण एका दुचाकीवरुन जाताना दिसत होते. अधिक चौकशी केली असता, दुचाकी मालकाच्या मुलाने त्याच्या दोन मित्रांना दुचाकी दिली होती. दोघे मित्र त्यांच्या मित्राला भेटायला जाणार होते. मित्राला भेटून येताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
अंबरनाथ हादरलं! 21 वर्षीय तरुणीला बोलावून घेत तीन मित्रांनी केला सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT