Omicron Variant: अखेर भारतातही झाली ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री, ‘या’ राज्यात सापडले 2 पॉझिटिव्ह
नवी दिल्ली: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) देशात येऊ नये यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न सुरु होते. मात्र, आता हे सगळे प्रयत्न विफल ठरल्याचं दिसत आहे. कारण ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दोन कोरोनाबाधित रुग्ण आता भारतात सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमधील असल्याचं समजतं आहे. खुद्द भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आरोग्य […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) देशात येऊ नये यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न सुरु होते. मात्र, आता हे सगळे प्रयत्न विफल ठरल्याचं दिसत आहे. कारण ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दोन कोरोनाबाधित रुग्ण आता भारतात सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमधील असल्याचं समजतं आहे.
खुद्द भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या हवाल्याने म्हटले आहे की, कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 5 पट जास्त धोकादायक आहे आणि इतर व्हेरिएंटपेक्षा तो अधिक वेगाने लोकांना संक्रमित करु शकतो.
आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित रूग्णांची ओळख पटली आहे. डब्ल्यूएचओने या नव्या व्हेरिएंटला Variant of Concern या श्रेणीत ठेवलं आहे. सगळ्यात आधी दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरिएंट आढळून आल्याचं समोर आलं होतं.
देशातील प्रसिद्ध डॉक्टर आणि मेदांता हॉस्पिटलचे संस्थापक डॉ नरेश त्रेहान यांनी या व्हेरिएंटबद्दल सांगताना असं म्हटलं आहे की, कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित एक व्यक्ती तब्बल 18 ते 20 लोकांना संक्रमित करू शकतो.