अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं प्रकरण, DNA चाचणीनंतर २० वर्षीय तरूणाला जामीन

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एका २० वर्षीय तरूणाला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्याची DNA चाचणी करण्यात आली त्यानंतर त्याला सात महिन्यांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे. सात महिन्यांपूर्वी या तरूणावर एक गंभीर आरोप झाला होता. मात्र विशेष न्यायालयाने त्याला आता जामीन मंजूर केला आहे. पोक्सो कायद्याच्या अंतर्गत या वीस वर्षीय तरूणाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

पत्नीचं तंबाखूचं व्यसन हे घटस्फोटाचं कारण असू शकत नाही-कोर्ट

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

१३ वर्षांची एक मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला याबाबत विचारलं असता या मुलीने कबुली दिली की एका २० वर्षांच्या तरूणासोबत तिचे शरीरसंबंध होते. त्याने तिला लग्नाचं वचन दिलं होतं. डिसेंबर २०१९ या महिन्यात तो एका ऑटोरिक्षा स्टँडजवळ तिला भेटला होता. एप्रिल २०२० पर्यंत हे दोघे भेट होते. या प्रकरणी २० ऑगस्ट २०२० ला या तरूणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र या प्रकरणात या तरूणाला आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. डीएनए रिपोर्टनुसार अल्पवयीन मुलीच्या मुलाचा पिता तो नसल्याचं सिद्ध झालं आहे.

कोर्ट म्हणतं…वस्त्र असलेल्या छातीला स्पर्श लैंगिक अत्याचार नाही!

ADVERTISEMENT

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरूणाने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जात त्याने एक महत्त्वाची बाब नमूद केली होती की माझ्याविरोधात ८ महिन्यांनी तक्रार नोंदवण्यात आली. मी या प्रकरणात दोषी नाही… निष्पाप आहे. मला जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणात अडकवण्यात येतं आहे असंही या तरूणाने त्याच्या अर्जात म्हटलं होतं. ऑगस्ट २०२० मध्ये या अल्पवयीन मुलीच्या आईने आपल्याकडून १० लाखांची मागणी केली होती असंही या तरूणाने म्हटलं आहे. त्यानंतर या तरूणाने DNA चाचणीचीही मागणी केली. मात्र त्या अल्पवयीन मुलीच्या आईने गर्भपात करण्यासाठी ३० हजारांची मागणी केली असाही आरोप या २० वर्षीय तरूणाने केला.

ADVERTISEMENT

सुरूवातीला या तरूणाने दाखल केलेल्या जामीन अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. कारण तरूणावर लागलेला आरोप अत्यंत गंभीर होता… अल्पवयीन मुलीच्या पालकांनी केलेल्या वकिलाने असाही युक्तीवाद केला की या तरूणाने मुलीला आणि तिच्या आईवडिलांना धमकावले असण्याचीही शक्यता आहे. तसंच या तरूणाला राहण्यासाठी घर नाही ही बाबही त्यांनी कोर्टाला सांगितली.

कोर्टाने काय निरीक्षण नोंदवलं?

कोर्टाकडे या तरूणाचा DNA रिपोर्ट आहे. ज्यानुसार ही बाब सिद्ध होते आहे की या अल्पवयीन मुलीच्या बाळाचा पिता हा नाही. त्या बाळाची आई अल्पवयीन मुलगीच आहे हे समजतंय मात्र ज्याच्यावर आरोप झाला आहे तो पिता नाही ही बाब समजते आहे. ज्याच्यावर आरोप झाला त्याचं वय २० वर्षे आहे. त्याला जर या आरोपांखाली तुरुंगात घातलं तर त्याचं सगळं पुढचं भवितव्य बरबाद होईल. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान तो दोषी आहे की नाही ठरवता येईल मात्र तूर्तास त्याला तुरुंगात धाडण्याची आवश्यकता नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT