नाशिक : जोशात धबधबा बघायला गेले अन्…; 22 पर्यटकांना मिळाला आयुष्यभर न विसरता येणारा धडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात रविवारी धबधबा पहायला गेलेले नागरिक अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकून बसले होते. 22 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून एक तरुण वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. बेपत्ता असलेला तरुण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

नेमकी घटना काय काय घडली? कसे अडकले प्रवासी?

सध्या स्मार्टफोनचा जमाना असल्याने तरुण पिढी सेल्फी, व्हिडीओच्या आहारी गेली आहे. अनेक जण फोटो काढण्यासाठी स्वतःला संकटात टाकतात, अशा अनेक घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत. काही ठिकाणी सेल्फी ही जीवाशी देखील आल्याचे पहायला मिळाले आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे पाण्याअभावी बंद झालेले झरे, धबधबे खळखळून वाहत आहेत. ते बघण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत. अशीच गर्दी त्रंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी धबधबा परिसरात देखील पाहायला मिळत होती. मात्र, याचदरम्यान अघटित घटना घडली.

त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, अचानक पाण्याचा प्रवाह वाढला

सुट्टीच्या दिवशी रविवारी त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यास पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळीअचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. यामुळे हे पर्यटक धबधब्यानजीकच अडकले. पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच मध्यरात्री बचाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, नाशिक क्लाइंबर अँड रेस्क्यू असोसिएशन, वन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन यांच्या खडतर प्रयत्नानंतर मध्यरात्री दीड वाजता या पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि धबधबा पहायला गेलेले आहे त्याच ठिकाणी अडकून बसले. स्थानिक 5 पर्यटक अगोदर बाहेर परतलेले. त्यांच्या माध्यमातून पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली होती. रविवारी उशिरा रात्रीपर्यंत मदतकार्य सुरु होते. एकूण अडकलेल्या 23 जणांपैकी 22 जणांना सुखरूप सुरक्षितस्थळी बाहेर काढण्यात आले. मात्र, यापैकी 1 तरुण बेपत्ता असल्याचं निदर्शनास आले. धबधबा पाहायला गेलेल्यांपैकी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अविनाश गरड वाहून गेला आहे. त्यामुळे अविनाशचा शोध घेण्यासाठी सोमवारी पहाटे पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाहून गेलेल्या तरुणाचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे. अडकून बसलेल्यांमध्ये तरुण मुलं-मुलींचा समावेश अधिक होता. घटनेमुळे या 23 पर्यटकांना आयुष्यभर न विसरता येणारा धडा मात्र मिळालाय, हे नक्की. राज्यातील इतर पर्यटनस्थळी पर्यटकांनी आपला जीव धोक्यात जाईल अशा ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT