पुणे : 25 वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं; 15 दिवसात दुसरी आत्महत्या
पुण्यातील हडपसर येथील 25 वर्षीय विवाहित तरुणाने स्वत:वर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल तोडकर असं आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. हडपसर येथील भगीरथी नगर परिसरात हा तरूण राहत होता. कपड्याचा व्यावसाय तो करत होता. रविवारी रात्री त्याने हा टोकाचा पाऊल उचलला आहे. पोलिसांनी […]
ADVERTISEMENT

पुण्यातील हडपसर येथील 25 वर्षीय विवाहित तरुणाने स्वत:वर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल तोडकर असं आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. हडपसर येथील भगीरथी नगर परिसरात हा तरूण राहत होता. कपड्याचा व्यावसाय तो करत होता. रविवारी रात्री त्याने हा टोकाचा पाऊल उचलला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर येथील भागीरथी नगर येथे विशाल तोडकर हा पत्नी आणि आई सोबत राहत होता. त्याचे कापड्याचे दुकाने होते. कुटुंबामध्ये सर्व ठीकठाक सुरू होते. मात्र मागील काही दिवसांपासून विशालचे घरात सतत वाद होत असायचे, त्यातून विशाल याने काल रात्री पावणे नऊच्या सुमारास स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी प्रथमिक माहिती समोर येत आहे.
पोलीस करत आहेत अधिक तपास
एका तरुणी सोबत प्रेम संबध असल्याने कुटुंबियांसोबत त्याचे वाद होत होते, अशी देखील माहिती मिळत आहे. त्यातूनविशालने आत्महत्या करण्याचे पाऊल उचल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नेमक आत्महत्या करण्याच कारण तपासातून पुढे येईल. तसेच त्याच्याकडे गावठी पिस्तूल कशी आली. याचा देखील तपास सुरू असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाचा खोलात जाऊन अधिक तपास पोलीस करत असून आत्महत्येचे नेमके कारण काय याचा देखील तपास पोलीस करत आहेत.