पुण्यात 25 वर्षीय अभिनेत्रीवर तिघांनी केला बलात्कार; ब्ल्यू फिल्म तयार करण्याची धमकी
मराठी चित्रपटात काम केलेल्या एका २५ वर्षीय अभिनेत्रीवर पुण्यात तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुला आणखी मोठ्या बॅनरची फिल्म मिळवून देतो असं आश्वासन देत आरोपींनी सर्वात आधी अभिनेत्रीशी जवळीक साधली. सदर अभिनेत्री पुण्यात हडपसर भागात राहते. तिन्ही आरोपींनी या अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करुन त्याची अश्लिल फिल्म बनवण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचं […]
ADVERTISEMENT
मराठी चित्रपटात काम केलेल्या एका २५ वर्षीय अभिनेत्रीवर पुण्यात तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुला आणखी मोठ्या बॅनरची फिल्म मिळवून देतो असं आश्वासन देत आरोपींनी सर्वात आधी अभिनेत्रीशी जवळीक साधली. सदर अभिनेत्री पुण्यात हडपसर भागात राहते.
ADVERTISEMENT
तिन्ही आरोपींनी या अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करुन त्याची अश्लिल फिल्म बनवण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचं पीडित अभिनेत्रीने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेनंतर वारजे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिजीत साठे, राजेश माल्या आणि आणखी एका महिला आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा : शुक्रवारी घराची रेकी केली नंतर मोबाईलवर मेसेज, तरुणाचा विवाहीत जोडप्यावर चाकुने हल्ला
हे वाचलं का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०१७ च्या दरम्यान अभिजीत गणपत साठे, राजेश माल्या, तसेच एका महिले सोबत २५ वर्षीय पीडित तरुणीची ओळख झाली. त्यावेळी पीडित तरुणी आणि आरोपी अभिजीत गणपत साठे हे दोघे संपर्कात आले. यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मी तुला मोठ्या बॅनरचा चित्रपट मिळवून देतो, आपण फोटोशूट कंपनी काढू असं आमिष दाखवत आरोपीने पीडित अभिनेत्रीकडून ६ लाख ४१ हजार रुपये उकळले.
२०१७ ते २०२१ या तीन वर्षांच्या काळत हा प्रकार घडला असून यादरम्यान आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचंही पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलंय. यानंतर आरोपी अभिजीतने पीडितेने ब्ल्यू फिल्म तयार करण्याची धमकी देत दहा लाख रुपयांची मागणी केली. यात आरोपीला राजेश माल्या आणि आणखी एका महिलेने साथ दिली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेरीस या अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT