धक्कादायक ! मुंबईत भरदिवसा घरातून तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत भरदिवसा घरातून एका लहान बाळाचं अपहरण करण्यात आलं आहे. मुंबईच्या काळाचौकी परिसरात ही घटना घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. काळाचौकी पोलिसांनी या प्रकरणीत तक्रार दाखल करुन घेत आरोपी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला जुने कपडे, मोबाईलच्या बदल्यात भांडी-बास्केट विकण्यासाठी आली होती. यादरम्यान घरात बाळाची आई आपल्या बाळासोबत एकटी होती. यावेळी बाळाच्या आईला बास्केट खरेदी करायचं होतं म्हणून तिने या महिलेला बोलावलं. यावेळी आरोपी महिलेने बाळाच्या आईकडे मोबाईल मागितला. मोबाईल आणण्यासाठी बाळाची आई घराच्या आत गेली असता आरोपी महिलेने डाव साधला.

आई आतल्या खोलीत गेल्याचं पाहताच संधी साधत आरोपी महिलेने बाळाला उचलून घरातून पळ काढला. ज्यावेळी बाळाची आई बाहेर आली तेव्हा घरात बाळ नसल्याचं पाहून तिला धक्का बसला. याचसोबत भांडीविक्रीकरणारी महिलाही तिकडे नसल्याचं लक्षात येताच सदर महिलेला आपल्या बाळाचं अपहरण झाल्याचं लक्षात आलं.

हे वाचलं का?

काळाचौकी पोलिसांनी या घटनेबद्दल तक्रार दाखल करुन घेतली असून आरोपी महिलेचा शोध सुरु केला आहे. सदर भांडी विक्री करणारी महिला ही बाळाला घेऊन जात असातना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याच परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती महिला बाळाला घेऊन जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे.

कर्जाची परतफेड करुनही जमीन परत करण्यास टाळाटाळ, सावकारावर गुन्हा दाखल

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT