अरे बापरे! नाशिक जिल्ह्यात Corona च्या Delta Variant चे 30 बाधित रूग्ण
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊन काही निर्बंध शिथिल होत असतानाच आज गावांतील रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची विशेष खबरदारी घेतली असून हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. त्यांनी माहिती दिली की ह्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर उपचार होऊ शकतो. रूग्णांमध्ये […]
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊन काही निर्बंध शिथिल होत असतानाच आज गावांतील रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची विशेष खबरदारी घेतली असून हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. त्यांनी माहिती दिली की ह्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर उपचार होऊ शकतो. रूग्णांमध्ये आढळलेला हा व्हेरिएंट डेल्टा प्लस व्हरिएंट नाही. त्यामुळे खबरदारी घेत आहोत घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही.
दुसऱ्या लाटेच्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या कमी असली तरी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत त्यांना कोणत्या विषाणूने ग्रासले आहे याबाबत शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने 155 रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठविले होते. त्यातील 30 नमुन्यांमधे डेल्टा विषाणू आढळून आला असल्याचे समजते.जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक शहरात 2 तर ग्रामीण भागात 28 रुग्ण हे कोरोनाच्या डेल्टा विषाणूने बाधित झाले आहेत. यात नाशिक शहरातील गंगापूर रोड, सादिकनगर या भागात, तर सिन्नर ,नांदगाव, येवला, निफाड, चांदवड, कळवण, घोटी या तालुक्यांचा समावेश आहे.
कोरोनाची दुसरी लाट जगासाठी आणि भारतासाठी किती भयंकर ठरली हे आपण पाहिलंच आहे. अशात भारतात जो स्ट्रेन आढळला त्याने भारतात कहर माजवला हेदेखील आपण पाहिलं आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने व्हायरसच्या या स्ट्रेनला Delta असं नाव दिलं आहे. WHO ने SARS COV 2 च्या मुख्य व्हेरिएंटला नावं देण्याचा निर्णय़ घेतला आहे. ज्यामध्ये आता भारतातल्या व्हेरिएंटला डेल्टा असं नाव दिलं आहे. या व्हेरिएंटची नावं ग्रीक अल्फाबेट्सचा वापर करून देण्यात आली आहेत.
कोणत्या व्हेरिएंटला काय नाव देण्यात आलं आहे?