Solapur: सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा, समाजासमोर ठेवला नवा आदर्श
विजयकुमार बाबर, सोलापूर सासू आणि सुनांमधले वाद ही गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली अशीच आहे. अनेकदा हे वाद घरापासून थेट पोलीस ठाणे आणि कोर्टापर्यंत गेल्याचं देखील आपण पाहिलं आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीत मुलीप्रमाणे सुना आणि आई प्रमाणे सासू असं नातं देखील जपलं जातं. असंच नातं सोलापुरातील मुंढे कुटूंबात होतं. या घरातील सासू-सुनांच्या नात्याचा आदर्श समाजाने […]
ADVERTISEMENT

विजयकुमार बाबर, सोलापूर
सासू आणि सुनांमधले वाद ही गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली अशीच आहे. अनेकदा हे वाद घरापासून थेट पोलीस ठाणे आणि कोर्टापर्यंत गेल्याचं देखील आपण पाहिलं आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीत मुलीप्रमाणे सुना आणि आई प्रमाणे सासू असं नातं देखील जपलं जातं. असंच नातं सोलापुरातील मुंढे कुटूंबात होतं.
या घरातील सासू-सुनांच्या नात्याचा आदर्श समाजाने घेण्यासारखा होता. पण मायेच्या एका धाग्यात ओवलेल्या मुंढे कुटुंबाची माळ काल तुटली. कारण त्यांच्या प्रेमळ सासूबाई ह्या माळेतून निखळल्या.
यावेळी सगळ्यात बोलकं दृश्य तेव्हा पाहायला मिळालं जेव्हा सासूबाईंच्या पार्थिवाला चारही सुनांनी खांदा दिला. परंपरेला छेदणारा सासू-सुनांच्या नात्यातील हा प्रत्यय सर्वांसमोर दिशादर्शक ठरला आहे.