ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये 4 जणांचा मृत्यू, Oxygen वेळेत न मिळाल्याचा नातेवाईकांचा आरोप

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाण्यातल्या वेदांत हॉस्पिटलमध्ये चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातली वर्तकनगर भागात हे रूग्णालय आहे. या चारही रूग्णांना ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचंही या रूग्णांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. मात्र रूग्णालय प्रशासनाने अद्याप हे मृत्यू कसे झाले ते स्पष्ट केलेलं नाही. थोड्याच वेळात रूग्णालय त्यांची भूमिका मांडणार आहे.

दुसरीकडे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी रूग्णालयाला भेट दिली आहे आणि प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ज्या रूग्णांचा मृत्यू झाला आहे ते अत्यवस्थ होते, अशी माहिती रूग्णालय प्रशासनाने निरंजन डावखरेंना दिली आहे.

अज्ञात व्यक्तीनं केला हॉस्पिटलमधील ऑक्सिजन बंद, 2 रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचा धक्कादायक आरोप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रूग्णालयाच्या आवारात मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले आहेत. या रूग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मृत रूग्णांच्या नातेवाईकांकडून बिल घेऊ नये अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे मनसेनेही अशीच मागणी केली आहे.

भारतात मे महिन्यात रोज पाच हजारांपेक्षा जास्त Corona मृत्यू होणार IHME चा अहवाल

ADVERTISEMENT

वेदांत रूग्णालयात मृत्यू झालेल्या चार रूग्णांची नावं

ADVERTISEMENT

अरुण शेलार, वय- 51

करूणा पष्टे, वय- 67

विजय पाटील, वय- 57

दिनेश पाणकर, वय- 41

या चारही रूग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाले आहेत असा आरोप केला आहे. आता रूग्णालय प्रशासन याबाबत काही वेळातच भूमिका मांडणार आहे आणि हे चार मृत्यू कसे झाले ते स्पष्ट करणार आहे.

यवतमाळ : दारु न मिळाल्यामुळे सॅनिटायजर प्यायलं, ७ जणांचा मृत्यू

राम कदम यांनी काय म्हटलं आहे?

वेदांत रूग्णालयात रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीडमध्येही अशीच घटना घडल्याचं समोर येतं आहे. अशा घटना वारंवार महाराष्ट्रात समोर येत आहेत. तीन पक्षांचं वसुली सरकार काय करतं आहे? या सरकारच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रात हजारो लोकांचा बळी गेला आहे असा आरोप भाजपचे नेते राम कदम यांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT