महाराष्ट्रात 4 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांचे निदान, 183 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 456 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 183 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 430 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 77 हजार 230 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९७.३ टक्के इतका […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 456 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 183 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 430 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 77 हजार 230 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९७.३ टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 41 लाख 54 हजार 890 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 69 हजार 332 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 90 हजार 427 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 2071 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 51 हजार 78 सक्रिय रूग्ण आहेत.
आज राज्यात 4456 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 69 हजार 332 इतकी झाली आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या
मुंबई -3602
ADVERTISEMENT
ठाणे- 6911
ADVERTISEMENT
रत्नागिरी-1087
पुणे-14091
सातारा- 5979
सांगली- 3562
सोलापूर-3152
अहमदनगर-5655
सक्रिय रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर राज्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्यात सर्वाधिक रूग्ण आहेत हेच या संख्येवरून दिसून येतं आहे. त्यानंतर ठाणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जास्त सक्रिय रूग्ण आहेत हेदेखील समोर येतं आहे.
कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोव्हिड राज्य कृती दलाने रविवार 5 सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.
रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली नाही. अद्यापही दररोज नवीन कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. तसेच तज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. डेल्टा प्लस या विषाणूच्या संसर्गाचा धोकाही आहेच. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. ठाकरे सरकारकडून निर्बंध जरी शिथील करण्यात आले असले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी रूग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाउनचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT