पुणे: 5 ते 6 जणांच्या टोळक्याकडून बाप-लेकाची हत्या, कोयत्याने केले वार
पुणे: पुण्यातील लोणीकंद परिसरात 5 ते 6 जणांच्या टोळके केलेल्या बेदम मारहाणीत बापलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुण हे 22 वर्षीय तरुणाला कोयता आणि बेसबॉलने मारहाण करीत होते. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडीलांना देखील त्या टोळक्याने मारहाण केली. या घटनेमध्ये दोघा बापलेकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे. सनी शिंदे (वय 22 […]
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील लोणीकंद परिसरात 5 ते 6 जणांच्या टोळके केलेल्या बेदम मारहाणीत बापलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुण हे 22 वर्षीय तरुणाला कोयता आणि बेसबॉलने मारहाण करीत होते. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडीलांना देखील त्या टोळक्याने मारहाण केली. या घटनेमध्ये दोघा बापलेकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे.
सनी शिंदे (वय 22 वर्ष) आणि कुमार शिंदे (वय 55 वर्ष) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणीकंद येथे राहणारा सनी शिंदे याला साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी खुनाच्या प्रकरणामधून जामीन मिळाला होता. तर आज सायंकाळच्या सुमारास सनी आपल्या घराबाहेर बसला होता. तेवढ्यात तिथे आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉल आणि दगडाने मारण्यास त्याला सुरुवात केली.
Pune Crime : क्षुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलांनी केली हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद