Nashik Crime: खून केला, अपघाताचा बनाव रचला; बोगस पत्नीही आणली; पण…
प्रविण ठाकरे, प्रतिनिधी (नाशिक) Nashik Insurance money Murder: नाशिक: नाशिकमध्ये (Nashik) विम्याची 4 कोटी रुपयांची रकम मिळावाी यासाठी वर्षभरापूर्वी एका व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आली होती. ज्याप्रकरणी आता तब्बल वर्षभरात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नाशिक शहर पोलिसांनीच (Nashik Police) दिली आहे. मात्र, हे संपूर्ण प्रकरण आपल्याला दिसतं तेवढं काही सोप्पं नाही. […]
ADVERTISEMENT
प्रविण ठाकरे, प्रतिनिधी (नाशिक)
ADVERTISEMENT
Nashik Insurance money Murder: नाशिक: नाशिकमध्ये (Nashik) विम्याची 4 कोटी रुपयांची रकम मिळावाी यासाठी वर्षभरापूर्वी एका व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आली होती. ज्याप्रकरणी आता तब्बल वर्षभरात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नाशिक शहर पोलिसांनीच (Nashik Police) दिली आहे. मात्र, हे संपूर्ण प्रकरण आपल्याला दिसतं तेवढं काही सोप्पं नाही. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊयात सविस्तरपणे. (6 accused killed a 46 year old man to get 4 crore insurance money creat fake an accident after the murder)
नेमकी घटना काय?
हे वाचलं का?
अशोक सुरेश भालेराव (वय 46 वर्ष) यांना गेल्या वर्षी 9 सप्टेंबर रोजी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली होती. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. साधारण वर्षभरापूर्वी सुरेश भालेराव यांचा झालेला मृत्यू हा अपघातीच असावा असा सगळ्यांचा समज झाला. पण हा काही मृत्यू अपघाती नव्हता तर अगदी सुनियोजितपणे अशोक यांची हत्या करुन तो अपघात असल्याचं भासवण्यात आलं होतं.
अशोक भालेराव यांचा तब्बल 4 कोटी रुपयांच्या विमा असल्याचं आरोपींना समजलं होतं. त्यामुळे त्याचे हे पैसे लाटण्यासाठी सहा आरोपींनी मिळून एक अत्यंत भयंकर प्लॅन रचला. ज्याची आरोपींनी अगदी चोखपणे मांडणी केली. सुरुवातीला अशोक भालेराव यांची बोगस पत्नी आरोपींनी समोर आणली. जिचे तशा स्वरुपाचे कागदपत्रंही तयारे केले. त्यानंतर आरोपींनी गाडीने धडक देऊन अशोक भालेराव यांची हत्या घडवून आणली. पण ही हत्या इतक्या सराईतपणे केली की, कोणालाही त्यांचा अपघाती मृत्यूच झाला आहे असं वाटेल.
ADVERTISEMENT
15 वर्षांच्या मुलाची क्रुरता; 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करत गळा चिरुन हत्या
ADVERTISEMENT
दरम्यान, अशोक भालेराव यांच्या मृत्यूनंतर आरोपींनी बोगस पत्नीचे जे कागदपत्रं तयार केले होते. त्याद्वारे विमा कंपनीकडे रक्कमेसाठी दावा केला. विमा कंपनीने देखील हा दावा मान्य केला आणि विम्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम ही रजनी उके या महिलेच्या खात्यात जमा केली. ज्यानंतर महिलेसह इतर सर्व आरोपींमध्ये या रक्कमेचं वाटपही झालं. पण इथेच खरी गडबड झाली.
असा उघड झाला गुन्हा…
त्याचं झालं असं की, सर्व आरोपींनी भालेराव यांच्या विम्याचे जे 4 कोटी रुपये मिळाले होते त्याचे वाटप करण्याचे ठरले होते. पण त्यापैकी एका आरोपीला ठरलेल्या रक्कमेपैकी पैसे कमी देण्यात आले. हाच राग मनात धरुन आरोपीने हा संपूर्ण घातपाताचा बनाव थेट मयताच्या भावालाच जाऊ सांगितला. ज्यानंतर अशोक भालेराव यांच्या भावाने थेट पोलिसात धाव घेतली आणि या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.
ज्यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवली अन् सुरुवातीला रजनी उके या महिलेला ताब्यात घेतलं. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच महिलेने संपूर्ण घटना आणि यातील आरोपींची माहिती पोलिसांना दिली. ज्या आधारे पोलिसांनी मुख्य संशयित मंगेश बाबूराव सावकार, प्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघा आरोपींना अटक केली.
दापोली तिहेरी हत्याकांड : हत्या केल्यानंतर तिन्ही महिलांना दिलं पेटवून; पैशासाठी भयंकर कृत्य
यावेळी संशयित मंगेश बाबूराव सावकार याच्या दुचाकीच्या डिक्कीतून एक बंदूक आणि 6 जिवंत काडतूसं देखील पोलिसांनी मिळाली. विशेष बाब म्हणजे गुन्हेगारांनी खून केलेला अशोक भालेराव हा देखील हा देखील विमा कंपन्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत सुरुवातीला आरोपीही होते.
अशोक भालेरावने विमा कंपन्याकडून 10 वेगवेगळ्या पॉलिसी 2019 पासून संशयितांसह सुरू केल्या होत्या. पण विमा कंपन्यांकडून काही पैसे मिळतच नव्हते. त्यामुळे संशयित आरोपींनी थेट अशोक भालेरावचाच काटा काढला.
दरम्यान, या सगळ्या घटनेने अशोक भालेराव यांच्या कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आरोपींनी ज्या पद्धतीने हत्या घडवून वर्षभर आपला गुन्हा लपवून ठेवला त्यामुळे नाशिक पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT