Nestle ची 60 टक्क्यांपेक्षा जास्त खाद्य उत्पादनं ‘Unhealthy’, मॅगी खात असाल तर बातमी वाचाच
Nestle ही खाद्य उत्पादनं तयार करणारी जगभरात मान्यता असलेली एक मोठी कंपनी आहे. मात्र नेस्ले आणि वाद यांचं नातंही जुनंच आहे. नव्या वादाचं कारण आहे नेस्ले या कंपनीने स्वतःच मान्य केलेली बाब. या कंपनीने आता स्वतःच स्पष्ट केलं आहे की आमची 60 टक्के खाद्य उत्पादनं Unhealthy आहेत. कंपनीच्या अंतर्गत झालेल्या प्रेझेंटेशन मध्ये ही बाब मान्य […]
ADVERTISEMENT

Nestle ही खाद्य उत्पादनं तयार करणारी जगभरात मान्यता असलेली एक मोठी कंपनी आहे. मात्र नेस्ले आणि वाद यांचं नातंही जुनंच आहे. नव्या वादाचं कारण आहे नेस्ले या कंपनीने स्वतःच मान्य केलेली बाब. या कंपनीने आता स्वतःच स्पष्ट केलं आहे की आमची 60 टक्के खाद्य उत्पादनं Unhealthy आहेत. कंपनीच्या अंतर्गत झालेल्या प्रेझेंटेशन मध्ये ही बाब मान्य करण्यात आली आहे की कंपनीची 60 टक्क्यांहून जास्त उत्पादनं आरोग्याविषयी घालून दिलेले नियम पूर्ण करत नाहीत.
काय म्हटलं आहे नेस्ले कंपनीने ?
आमच्या कंपनीच्या 60 टक्क्यांहून जास्त खाद्य उत्पादनं आणि ड्रिंक्स आरोग्यदायी अन्नाला आवश्यक असलेली व्याख्या पूर्ण करत नाहीत. आमची काही उत्पादनं तर कधीही आरोग्यदायी किंवा ज्याला हेल्दी फूड म्हणतो तशी होणार नाहीत. बिझनेस टुडेने दिलेल्या माहितीनुसार आमच्या उत्पादनांपैकी 14-15 टक्के उत्पादनांमध्ये साखर आणि सोडिअम यांचं प्रमाण जास्त होतं मात्र आम्ही ते आम्ही केलं आहे. गेल्या सात वर्षांमध्ये आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहोत.