महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 163 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजार 944 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 61 लाख 66 हजार 620 बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.82 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 5 हजार 560 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात आज 163 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतके झालं आहे.

ADVERTISEMENT

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 1 लाख 16 हजार 137 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 69 हजार 2 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 1 हजार 366 होम क्वारंटाईन तर 2 हजार 676 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 64 हजार 570 सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात राज्यात 5 हजार 560 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील रूग्णांची एकूण संख्या 63 लाख 69 हजार 2 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात 15 ऑगस्टपासून निर्बंधातून सशर्त स्वातंत्र्य देण्यात आलं आहे अशी महत्त्वाची घोषणा महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. हॉटेल्स, रेस्तराँ 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्तराँ सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सिनेमागृहं आणि नाट्यगृहं पुढील सूचनेपर्यंत बंद राहणार आहेत. आजच कॅबिनेटची बैठक पार पडली या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी माहिती दिली आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यास टास्क फोर्सने विरोध दर्शवला आहे. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात एक बैठक होणार आहे त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

शाळा, महाविद्यालयं सुरू कऱण्याबाबत एक बैठक होणार आहे. या बैठकीला आरोग्य विभाग, टास्क फोर्सचे सगळे सदस्य आणि मुख्यमंत्री असणार आहेत. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल. 18 वर्षांखालील मुलांचं लसीकरण न झाल्याने टास्क फोर्सने शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान रेल्वे पासबद्दलही राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जो क्यू आर कोड मिळेल त्यानंतर मासिक किंवा त्रैमासिक पास देण्यात येतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT