गडचिरोली : ७० वर्षाच्या आजीबाईंची वाघाशी झुंज, जिद्दीने सामना करुन वाघाला लावलं पळवून
– व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली प्रतिनीधी जीवनात बाका प्रसंग समोर आला की माणूस मोठ्यातल्या मोठ्या संकटाचा सामना करु शकतो. गडचिरोली जिल्ह्यातल्या जोगना वनक्षेत्रातील मुरमुरी गावातील ७० वर्षीय आजीबाईंनी याचा वस्तूपाठ घालून दिला आहे. सरिता चहाकाटे यांनी २२ नोव्हेंबरला वाघाशी यशस्वी झुंज देत स्वतःचा जीव वाचवला आहे. इतकच नव्हे तर आभाळाएवढ्या संकटाचा सामना केल्यानंतरही विश्रांती न घेते […]
ADVERTISEMENT
– व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली प्रतिनीधी
ADVERTISEMENT
जीवनात बाका प्रसंग समोर आला की माणूस मोठ्यातल्या मोठ्या संकटाचा सामना करु शकतो. गडचिरोली जिल्ह्यातल्या जोगना वनक्षेत्रातील मुरमुरी गावातील ७० वर्षीय आजीबाईंनी याचा वस्तूपाठ घालून दिला आहे. सरिता चहाकाटे यांनी २२ नोव्हेंबरला वाघाशी यशस्वी झुंज देत स्वतःचा जीव वाचवला आहे.
इतकच नव्हे तर आभाळाएवढ्या संकटाचा सामना केल्यानंतरही विश्रांती न घेते या आजीबाई लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागल्या आहेत. याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबरच्या दिवशी आजीबाई आपल्या शेतात काम करत होत्या. तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी बांधावर आल्या असताना त्यांना डोळ्यासमोर वाघ दिसला आणि त्यांची चांगलीच पाचावर धारण बसली.
हे वाचलं का?
वाघानेही सावज समोर पाहून सरिता चहाकाटे यांच्यावर हल्ला केला. परंतू सरिताताईंनी हार न मानता वाघाशी झुंज देत किमान १० मिनीटं आपला बचाव केला. या झुंजीदरम्यान आजीबाईंनी केलेल्या आरडाओरड्यामुळे आजुबाजूचे मजूर याठिकाणी धावून आले. माणसं जमा झाल्याचं पाहताच वाघाने या ठिकाणावरुन धूम ठोकली.
22 नोव्हेंबर ला दुपारी 12:30 च्या सुमारास ही घटना घडली. आम्हाला माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृद्ध महिलेला कुठलीही इजा झालेली नाही. वनविभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे आज या आज्जीचा जीव वाचला.
ADVERTISEMENT
ताडोबा वनक्षेत्रातून पलायन केलेल्या जवळपास 10 ते 15 वाघानी या भागात बस्तान मांडल्याने नागरिकांवरील वाघाचे हल्ले वाढले आहेत. आत्तापर्यंत वाघाने 18 नागरिकांचा बळी घेतला आहे. यामुळे वनविभागासमोर नवे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT