एकट्या राहणाऱ्या आजींना आलं एक लाखाचं वीज बिल, हार्ट अटॅक यायचाच बाकी राहिला..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नालासोपारा पश्चिमेच्या एका जुन्या इमारतीत राहणाऱ्या 70 वर्षीय आजींना  महावितरणाकडून तब्बल  एक लाखाचे बिल पाठविल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्रसेल मारिया असं या आजींचे नाव असून त्या घरात एकट्याच राहतात. दर महिन्याला या आजींना  पंखे आणि लाईट वापराचे 200 ते 250 रूपये  बिल येत होते. मात्र या महिन्यात आजींना तब्बल 97 हजार 520 रूपये बिल पाठवण्यात आलं. महावितरणचं हे बिल पाहून आजी थोडक्यात हार्ट अटॅकच्या धक्क्यातून बचावल्या. महावितरणाच्या या अनागोंदी कारभारामुळे आजींची प्रकृती ढासळली आहे. घरात टीव्ही, फ्रिज नसताना देखील डोळे बंद करून भरमसाठ बिल पाठविणाऱ्या महावितरणाच्या कारभाराविरोधात  रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाल्या आजी?

हे वाचलं का?

‘माझ्या घरात दोन लाईट आहेत, दोन पंखे आहेत तसंच टॉयलेट बाथरूममधे लाईट आहेत. दुसरं काहीही नाही. घरात टीव्ही आणि फ्रिजही नाही. तरीही मला 97 हजारांचं बिल पाठवण्यात आलं. ते पाहून मला चक्कर आली, ताप आला हार्ट अटॅक यायचाच बाकी राहिला होता.’ असं आजींनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.

‘आजीचं मीटर काही दिवसांपूर्वी बदलण्यात आलं आहे. मागच्या कुणीतरी बिल भरलं नसणार त्यांचं बिल यांना पाठवण्यात आलं आहे. आजी कधीही कुणाकडून मदत घेत नाहीत. आज वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्या स्वतः काम करून आपला चरितार्थ चालवतात. अशात एक लाखाचं बिल त्यांना पाठवण्यात आलं आहे. महावितरणचे लोक काय करत आहेत? यांचे भ्रष्ट अधिकारी सामान्य माणसांना त्रास देत आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे कारण आता आजींची तब्बेत बिघडली असून त्यांना रूग्णालयात घेऊन जावं लागतं आहे. त्यांच्या या परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न या आजींच्याच इमारतीत राहणाऱ्या इंद्रदेव पांडे यांनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

काय घडला प्रकार?

ADVERTISEMENT

नाला सोपारा या ठिकाणी राहणाऱ्या ७० वर्षांच्या क्रसेल मारिया परेरा यांना महावितरणने 97 हजारांच बिल पाठवलं आहे. हे बिल पाहून त्या हबकून गेल्या आणि त्यांनी धसका घेतला आहे. त्यांना हार्ट अटॅकच यायचा बाकी राहिला होता असं इमारतीतल्या लोकांनी मुंबई तकला सांगितलं. तसंच या प्रकाराबद्दल महावितरणवर लोकांनी संतापही व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT