Omicron : टेन्शन पुन्हा वाढलं! ओमिक्रॉनचे महाराष्ट्रात आणखी 75 रूग्ण, एकूण संख्या 653
महाराष्ट्रात ओमिक्रॉनने टेन्शन चांगलंच वाढवलं आहे. ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत रोज भर पडते आहे. महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे 75 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 653 झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 75 ओमिक्रॉन रूग्णांची नोंद झाली आहे. हे सगळे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत. मुंबईत 40, ठाणे मनपात 9, पुणे मनपात 8, पनवेल 5, […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात ओमिक्रॉनने टेन्शन चांगलंच वाढवलं आहे. ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत रोज भर पडते आहे. महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे 75 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 653 झाली आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात 75 ओमिक्रॉन रूग्णांची नोंद झाली आहे. हे सगळे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत. मुंबईत 40, ठाणे मनपात 9, पुणे मनपात 8, पनवेल 5, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 3, पिंपरी चिंचवडमध्ये 2, भिवंडी, उल्हासनगर, सातारा, अमरावती, नवी मुंबईमध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आढळला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 653 झाली आहे. यापैकी 259 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
Omicron: देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात