महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 120 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 756 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 60 लाख 16 हजार 506 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 96.34 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज 7 हजार 302 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज 120 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातला मृत्यू दर 2.9 टक्के इतका झाला आहे.

ADVERTISEMENT

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 62 लाख 64 हजार 59 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 45 हजार 57 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 872 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3 हजार 743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 94 हजार 168 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 7 हजार 302 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ही 62 लाख 45 हजार 57 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या

हे वाचलं का?

मुंबई – 10 हजार 309

ठाणे- 11 हजार 710

ADVERTISEMENT

पुणे- 15 हजार 869

ADVERTISEMENT

सांगली- 10 हजार 737

कोल्हापूर- 10 हजार 701

नाशिक- 1 हजार 159

अहमदनगर- 3 हजार 737

नागपूर- 1 हजार 692

जर आपण सक्रिय रूग्णांच्या संख्येवर नजर टाकली तर हे लक्षात येतं की पुण्यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण आहेत. तसंच सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधले रूग्णही कमी होतना दिसत नाहीयेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. त्याचसोबत डेल्टा व्हेरिएंटचीही भीती व्यक्त होते आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी झालेली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधीही स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात या दोन्ही गोष्टींची भीती असल्याने लेव्हल थ्रीचे निर्बंधच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या अभावी एकही मृत्यू झालेला नाही असं प्रतिज्ञापत्र बुधवारीच राज्य सरकारने कोर्टात दाखल केलं आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे अनेक मृत्यू झाले मात्र ऑक्सिजनच्या अभावी कुणाचाही मृत्यू झालेला नाही हे या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT