महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण, 300 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. दैनंदिन रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये अनेक विषयांबाबत माहिती देण्यात आली. भारतासह जगभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. जगभरातील मागील आठवड्याभरात 25 लाखांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. तर सक्रिय रूग्णांची संख्या 4 कोटी 49 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

ADVERTISEMENT

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की जगभरात 115 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

युरोपमधील चार खंड, युके, फ्रान्स आणि अमेरिकामध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकामध्ये 11 जानेवारी रोजी एका दिवसात 11 लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली.

ADVERTISEMENT

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील अॅक्टिव रुग्णांची संख्या 9,55,319 इतकी झाली आहे. देशातील दैनंदिन सरासरी रुग्णसंख्या 1,50,307 इतकी झाली आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 9.82 टक्क्यांवर पोहचला आहे. 30 डिसेंबर रोजी देशात 13 हजार रुग्णांची नोंद झाली होती. आत 12 डिसेंबर रोजी ही संख्या वाढून एक लाख 94 हजार इतकी झाली आहे. सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या राज्यात पश्चिम बंगाल पहिल्या स्थानावर आहे. पश्चिम बंगालमध्ये 32.18% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये 23.1% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर महाराष्ट्रात 22.39% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 4.47% इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT