स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून पत्नीला जिवंत जाळलं, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू

मुंबई तक

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात सवना येथे एका वयोवृद्ध पतीने आपल्या पत्नीला स्वयंपाक करण्यासाठी उशीर झाला म्हणून रॉकेल ओतून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुंडलिक शिवराम नाईक असं या आरोपी पतीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २५ फेब्रुवारीला ही घटना घडली असून कुंडलिक यांची पत्नी सुंदराबाईचा २६ तारखेला उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुंडलिक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात सवना येथे एका वयोवृद्ध पतीने आपल्या पत्नीला स्वयंपाक करण्यासाठी उशीर झाला म्हणून रॉकेल ओतून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुंडलिक शिवराम नाईक असं या आरोपी पतीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २५ फेब्रुवारीला ही घटना घडली असून कुंडलिक यांची पत्नी सुंदराबाईचा २६ तारखेला उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कुंडलिक नाईक आणि सुंदराबाई यांच्यात नेहमी वाद व्हायचे. २५ फेब्रुवारीला दोघांमध्ये स्वयंपाक का केला नाही यावरुन वाद झाला. याच वादाचा राग मनात ठेवून कुंडलिक यांनी सुंदराबाई झोपल्यानंतर हातपाय बांधून रॉकेल ओतत त्यांना पेटवून दिलं. यानंतर घरातून धूर निघायला लागल्यामुळे शेजारच्या व्यक्तींने येऊन पाहिलं असता त्यांना हा प्रकार उघडकीस आला.

पिंपरी: लॉजवर सुरु होता वेश्याव्यवसाय, अभिनेत्रीसह तीन महिलांची पोलिसांनी केली सुटका

शेजारच्यांनी ही आग विजवून सुंदराबाई यांची सुटका करत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतू २६ फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गोरेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी हत्येच्या गुन्ह्याखाली कुंडलिक नाईक यांना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

क्रौर्याचा कळस! लग्नाला नकार दिल्याने तरूणीवर बलात्कार, मुंडकं धडावेगळं करत केली हत्या

हे वाचलं का?

    follow whatsapp