चिंताजनक, राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना Corona ची लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 24 तासात दहा हजारांच्या जवळपास रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. राज्यात मागील काही दिवसापासून दररोज 10 हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. ज्यामुळे आरोग्य सेवेवरील ताण सातत्याने वाढत आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे मागील गेल्या 24 तासात राज्यात 12,182 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (9 march 2021 found 9927 new corona positive patients in the maharashtra)

ADVERTISEMENT

आज दिवसभरात कोरोनाचे 56 रुग्ण दगावले असल्याची माहिती देखील मिळते आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना मृतांचा आकडा हा 52556 एवढा झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.35 टक्के एवढा आहे. तर राज्यात आताच्या घडीला 95,332 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona रूग्ण वाढल्याने जळगावात ११ ते १५ मार्च जनता कर्फ्यू

हे वाचलं का?

आज राज्यात 12,182 कोरोना रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 20,89,294 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 93.34 टक्के इतका आहे.

आज मुंबईत 1012 रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात 1494 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर नागपूरमध्ये 1292 आणि अमरावतीमध्ये 448 नवे रुग्ण सापडले आहेत.

ADVERTISEMENT

  • राज्यात आतापर्यंत 22,38,398 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

ADVERTISEMENT

  • त्यापैकी 20,89,294 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  • राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 52556 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • सध्या राज्यात 95,332 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,70,22,315 नमुन्यांपैकी 22,38,398 (13.15 टक्के ) नुमने हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,57,962 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,827 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत पुन्हा Lockdown लागणार का? पालकमंत्र्यांनी दिलं हे उत्तर

    दरम्यान, मुंबईत लॉकडाऊनची आवश्यकता भासली तर लॉकडाऊन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भातला अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. मुंबईत कोरोना रूग्ण वाढत आहेत. इतर ठिकाणीही वाढत आहेत. अशात नाईट क्लब सर्वात आधी बंद करण्यात येतील अशी शक्यता आहे. अधिवेशन झाल्यानंतर मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया, चौपाटी या ठिकाणी रात्री जी विनाकारण गर्दी होते तिथे बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल. नाईट कर्फ्यू लावायचा की लॉकडाऊन करायचा याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT