कोरोना झाल्याच्या भीतीने वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामती: कोरोनाची (Corona) लक्षणे जाणवत असल्याने आपल्याला कोरोना झाल्याची भीती मनात बाळगून एका 65 वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात भिगवणमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश विष्णूपंत भगत असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी भगत यांच्या मुलाने याबाबत पोलिसात माहिती दिली. प्रकाश भगत यांना गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोना सदृश्य लक्षणे दिसत होती. त्यांना अंगदुखी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता.

विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस देखील घेतली होती. पण मागील चार दिवसांपासून त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसू लागली होती. त्यावर कुटुंबीयांनी देखील त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याची सल्ला दिला होता. मात्र आपण कोरोना चाचणी करून घेणार नाही असं त्यांनी आपल्या घरातील लोकांना सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोरोनामुळे नवऱ्याचा मृत्यू, बातमी समजताच पत्नीची चिमुकल्यासह आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी घटना

दरम्यान, आपल्याला कोरोना झाला असल्याची भीती मनात बाळगून आणि त्याच नैराश्यातून भगत यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भिगवण पोलिसात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मात्र, भिगवण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

ADVERTISEMENT

‘कोरोना हा काही खूप मोठा आजार नाही’

ADVERTISEMENT

‘कोरोना हा साधा आजार आहे तो काही खूप मोठा आजार नाही. त्यावर आपण घरी राहून देखील उपचार करु शकतो.’ असा दावा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केला आहे.

लोकांनी कोरोना झाला म्हणून अजिबात घाबरुन जाण्याची गरज नाही किंवा कोरोनाविषयी अनाठायी भीती देखील बाळगण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Lockdown आणि कोरोनाला कंटाळून केशकर्तनालय दुकानदाराची आत्महत्या

डॉ. गुलेरिया यांनी तर असाही दावा केला आहे की, कोरोनाचे 90 टक्के रुग्ण हे घरात राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास सहज बरे होऊ शकतात. कोव्हिड-19 संसर्ग हे एक साधं इन्फेक्शन आहे. 85 ते 90 टक्के लोकं आहेत त्यांच्यामध्ये साधारण ताप, सर्दी, घशात खवखव याच अशा गोष्टी आढळून येतात. त्यांना ना ऑक्सिजनची गरज आहे ना रेमडेसिवीरची आवश्यकता आहे. तसंच त्यांना जास्त औषधांची देखील गरज नसते. यावेळी आपण तापाची गोळी घ्या, सर्दी-अंगदुखीची औषधं घ्या, घरगुती उपाय करा. वाफ घ्या, योगा करा. यानेच आपण बरे व्हाल. त्यामुळे आपल्या ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन घरी ठेवण्याची गरज नाही. अशी माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचा बागुलबुवा करून नैराश्य ओढावून घेऊ नका.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT