Shanti Bhushan : असा वकील ज्याने इंदिरा गांधींचं पंतप्रधानपदच धोक्यात आणलं होतं

मुंबई तक

Ex Law Minister Shanti Bhushan passed away : देशाचे माजी कायदे मंत्री शांती भूषण (Shanti Bhushan) यांचे निधन झाले. वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी नोएडा (Noida) येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून शांती भूषण खूप आजारी होते. देशातील सर्वात मोठ्या वकिलांच्या यादीत शांती भूषण यांचे नाव होते (Top in lawyer List). त्यांनी इंदिरा गांधींविरुद्धच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ex Law Minister Shanti Bhushan passed away : देशाचे माजी कायदे मंत्री शांती भूषण (Shanti Bhushan) यांचे निधन झाले. वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी नोएडा (Noida) येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून शांती भूषण खूप आजारी होते. देशातील सर्वात मोठ्या वकिलांच्या यादीत शांती भूषण यांचे नाव होते (Top in lawyer List). त्यांनी इंदिरा गांधींविरुद्धच्या खटल्याची ( Advocated Against Indira Gandhi case) वकिलीही केली होती ज्यात त्यांची निवडणूक रद्दबातल ठरली होती. एवढेच नाही तर या प्रकरणातील पराभवानंतर इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. जाणून घेऊया या प्रकरणाविषयी. (shanti Bhushan advocated the case against Indira Gandhi)

निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे दोन तुकडे झाले होते

1971 मध्ये पाचव्या लोकसभेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे दोन तुकडे झाले होते. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने लोकसभेच्या 545 पैकी 352 जागा जिंकल्या. तर विरोधी काँग्रेसला (ओ) केवळ 16 जागा मिळाल्या. याच निवडणुकीत इंदिरा गांधींनी गरीब हटाओचा नारा दिला होता.

1977 मध्ये इंदिरा गांधींना झालेल्या अटकेचा काँग्रेसला कसा झाला होता फायदा?

शांती भूषण यांनी राजनारायण यांची बाजू मांडली

इंदिरा गांधी यांनी या निवडणुकीत रायबरेलीमधून निवडणूक लढवली आणि त्यांनी संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार राजनारायण यांचा पराभव केला. पण राजनारायण यांना आपल्या विजयाची खात्री होती. अशा स्थितीत त्यांनी इंदिरा गांधींच्या विजयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले. या खटल्यात शांती भूषण यांनी राजनारायण यांची बाजू मांडली. हे प्रकरण इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण या नावानेही ओळखले जाते.

हे वाचलं का?

    follow whatsapp