देशात ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय, जनतेनं सावध रहावं-मोदी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्या देशात सध्या आंदोलनजीवी अशा नव्या जमातीचा उदय झाला आहे. या जमातीपासून भारताच्या जनतेने सावध रहावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतल्या भाषणात म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या आणि आंदोलनामध्ये सहभाग घेणाऱ्या राजकीय पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडाडून टीका केली आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आपण आजवर श्रमजीवी, बुद्धिजीवी यांच्यासारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या देशात आंदोलनजीवी अशी नवी जमात उदयास येते आहे. हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. हे लोक आंदोलन केल्याशिवाय जगू शकत नाहीत. आंदोलनासोबत ते आपल्या जगण्यासाठीही मार्ग शोधत असतात. आपण अशा लोकांना ओळखलं पाहिजे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात म्हटलं आहे.

हे आंदोलनजीवी लोक सर्व ठिकाणी जाऊन वैचारीक भूमिका मांडत असतात. लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतात. अनेक नव्या गोष्टी सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे अशा आंदोलनजीवी लोकांपासून भारतातल्या जनतेने सावध रहायला हवं. ज्यांना स्वतःला नीट उभं राहता येत नाही असे लोक दुसऱ्यांच्या आंदोलनात जाऊन बसतात हीच त्यांची ताकद असते. हे आंदोलनजीवी लोक परजीवी असतात असंही मोदींनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT