सुप्रिया सुळेंची माफी न मागताच अब्दुल सत्तारांची दिलगिरी, राष्ट्रवादी राजीनाम्यासाठी आक्रमक

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र त्यात त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेतलेलं नाही. ५० खोक्यांवरून जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा टीका करताना सुप्रिया सुळे यांचं नाव घेऊन आक्षेपार्ह शब्द वापरला. मात्र माफी मागत असताना महिलांची मनं दुखावली असतील तर मी दिलगीर आहे असं म्हटलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आंदोलन केलं आहे. मुंबईत अब्दुल सत्तारांच्या बंगल्याबाहेर जोरदार राडा पाहण्यास मिळाला आहे.

ADVERTISEMENT

अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले?

‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत अब्दुल सत्तार यांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या सुविद्य खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान केला आहे. त्यांची माफी मागून जोपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. महिलांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी काही प्रमाणात बंगल्याच्या काचांचीही तोडफोड झाली आहे. पोलिसांनी या आंदोलकांना आवर घातला. मात्र अब्दुल सत्तार राजीनामा देईपर्यंत गप्प बसणार नाही असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

अब्दुल सत्तार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना काय म्हटलं आहे?

मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. ५० खोक्यांवरून जे सातत्याने डिवचलं जातं आहे त्यातून जो राग आला त्या रागातून ते बोललो आहे. मी सुप्रिया सुळेंचाही अपमान केलेला नाही त्याप्रमाणेच एकाही महिलेचा अपमान केलेला नाही. कुठल्याही महिलांची मनं दुखावली असतील तर मी सॉरी म्हणतो. दिलगीरी व्यक्त करतो असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. तसंच कुठलाही अल्टिमेटम वगैरे दिला तरीही काही फरक पडत नाही असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT